उजनी उपसा जलसिंचन योजना, आमदार काळे यांच्याकडुन दिशाभुल-कैलास राहणे

0

कोपरगांव :

            माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या खर्चाने तसेच व्यक्तीगतरित्या तालुक्याच्या पश्चिम भागातील रांजणगांव देशमुख सह सात गावांची पिण्यांच्या पाण्याची प्रादेशिक पाणी योजना चालविली याशिवाय वीज बिल थकल्यामुळे उजनी उपसा सिंचन योजनेचे कनेक्शन कायमस्वरूपी पी.डी (पर्मनंट डिसक्नेक्ट) झाले होते ते तत्कालीन उर्जामंत्री चंद्रशेखर बानवकुळे यांच्याकडुन पुर्ववत चालु करून घेण्यासाठी माजी आ.स्नेहलता कोल्हे यांनी शर्थीचे प्रयत्न केले असे असतांना आमदार आशुतोष काळे २०१४ ते २०१९ या स्नेहलता कोल्हे यांच्या कार्यकाळात सदर योजनेकडे दुर्लक्ष झाले हा धादांत खोटा अपप्रचार करत आहेत, याउलट माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनीच या योजनेत लक्ष घालुन त्यातील त्रुटी दुर करण्यासाठी संबंधीत अधिकारी, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, मंत्रालय स्तर विधीमंडळ अधिवेशन काळात सातत्यांने पाठपुरावा करून ही योजना मार्गी लावली असा खुलासा भाजपचे तालुकाध्यक्ष कैलास राहणे यांनी केला,  याशिवाय तत्कालीन आमदार अशोक काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात त्यांची जबाबदारी असतांना देखील या योजनेकडे ढुंकूनही पाहिले नाही असा टोला लगावला आहे. 

          कैलास राहणे पुढे म्हणाले की, तालुक्याच्या पश्चिम भागातील रांजणगांव देशमुख, जवळके, धोंडेवाडी, वेस- सोयेगांव, अंजनापुर, बहादरपुर व मनेगांव या सात गावांची प्रादेशिक पाणी पुरवठा योजना उजनी उपसा सिंचन योजनेवर अवलंबुन आहे. या जिरायती भागातील गांवच्या नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे म्हणून माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी सत्ता नसतांनाही या योजना कामात माणुसकीच्या नात्याने लक्ष दिले संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी वेळप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या मोठ्या अश्वशक्तीच्या वीज मोटारी, संबंधीत तांत्रीक कर्मचा-यांचे मनुष्यबळ पुरवुन या गावातील प्रत्येक रहिवासीयांना पिण्यांचे पाणी पुरविले आहे, कुठल्याही योजनेचे कायमस्वरूपी पीडी झालेले वीज कनेक्शन पुन्हा चालु होत नाही असे असतांना केवळ जनता हितासाठी आपणच सदर योजनेबाबत तत्कालीन उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबरोबरच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडुन सदरची योजना चालु करून करून घेण्यासाठी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी प्रयत्न करत अहमदनगर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कार्यालयात स्वतः पैसे भरत पीडी कनेक्शन पूर्ववत केले त्या घटनेचा मी स्वतः साक्षीदार आहे, ही वस्तुस्थिती असतांनाही आमदार आशुतोष काळे त्याकडे जाणूनबुजुन दुर्लक्ष करत आहेत.

वस्तुस्थिती समजुन घेवुनच सवंग लोकप्रियतेच्या बातम्या द्याव्यात, या योजनेत सध्या कालवा पाटपाण्यांच्या आर्वतनांत पाणी भरून घेतले जात आहेत त्याचे पाईप, चाऱ्या, वितरिका देखील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या खर्चाचे आहेत, प्रत्येक आवर्तन काळात उजनी उपसा सिंचन योजना व त्या अंतर्गत तलाव पाण्याने भरून घेण्याची भरपूर काळजी घेतलेली आहे, जिल्हा परिषद अंतर्गत याला निधी मिळावा म्हणूनही प्रयत्न केलेले आहेत व आता सध्याही माजी आमदार स्नेहलता कोल्हे, ह्याच या योजना कामात सातत्याने लक्ष देत आहेत, या सात गावात सदरची योजना यापूर्वी कोणी चालवली  हे देखील विरोधकांनी जाणून घ्यावे मगच मखलाषा कराव्यात असेही शेवटी कैलास राहणे म्हणाले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here