उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेची कुटुंबप्रमुख म्हणून सेवा केली : गगण हाडा

0

पोहेगांव : हिंदुहृदयसम्राट  बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्री असताना जनतेची सेवा कुटुंबप्रमुखा प्रमाणे केली. कोरोना सारख्या महामारीतुन महाराष्ट्राची मुक्तता केली. ते मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र नंबर एकचे राज्य निर्माण झाले. पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना जनतेची पसंती आहे असे प्रतिपादन युवा सेनेचे गगन हाडा यांनी केले.  ते काल कोपरगाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहामध्ये मार्गदर्शन करताना बोलत होते.

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा सेनेच्या वतीने कोपरगाव शहरामध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले. कोपरगाव तालुका ग्रामीण रुग्णालय मध्ये युवा सेनेच्या वतीने बीपी चेकर मशीन, टेंपरेचर मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या. 

यावेळी शिवसेनेचे भरत मोरे, अस्लम शेख, बालाजी गोर्डे, कान्हा हाडा,सपनाताई मोरे ,राखीताई विसपुते, निखिल कंक्राळे, राहुल हाडा, विनय टाक, गौतम निंदाने, रितेश वाघिरे, रिहान शेख, प्रथमेश आभाळे, स्वप्निल निरभवणे, प्रतीक मोरे, वरून टाक, समीर पटवेकर अदी उपस्थित होते. कोपरगाव सह तालुक्यात विविध ठिकाणी उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. मिंदे घटाने गद्दारी करून उद्धवजी ठाकरेना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला लावला हे जनतेला मान्य केले नाही. त्यामुळे आता जनता साहेबांच्या पाठीमागे भक्कमपणे उभी आहे असेही गगन हाडा यांनी सांगत उपस्थितांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here