अहमदनगर – महाराष्ट्र नाभिक महामंडळ अहमदनगर शाखेच्यावतीने तपोवन रोड येथील संत सेना महाराज भवन, सावेडी, नगर येथे नाभिक समाजाच्यावतीने शांताराम राऊत, विकास मदने, शिवाजी दळवी, अरुण वाघ, अजय कदम, उमेश शिंदे आदिंनी आमरण उपोषण सुरु केले आहे. आज उपोषणाचा तिसर्या दिवस असून उपोषणास विविध स्तरातून पाठिंबा मिळत आहे.
गुरुवार दि. 14 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील नाभिक समाजाच्या विविध संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहून पाठिंबा देण्यासाठी येत आहेत. त्याचप्रमाणे समस्त सलून दुकानदार, नाभिक समाजातील सर्व बांधव, खलिफा समाजातील सर्व बांधव, तसेच नोकरदार वर्ग यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तरी अहमदनगर जिल्ह्यातील सलून व्यवसायिक व नाभिक बांधव खलिफा बांधव यांनी आपली दुकाने बंद ठेवून आपल्या बायका पोरांसह या चळवळीत सहभाग होऊन आंदोलनात सहभागी होऊन संत सेना भवनांवर हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अहमदनगर जिल्हा सलून चालक-मालक असोसिएशन च्यावतीने करण्यात आले आहे.