कोपरगाव (वार्ताहर) सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सह महाविद्यालय विद्यालय आदींना सुट्टी मिळाली आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत गोदावरी कालवे भरभरून वाहत आहे. उन्हाळ्याची तीव्रता जास्त असल्याने घरातील प्रमुख व्यक्तींना बरोबर घेत चिमुकल्यांना पोहण्याचा मोह काही आवरत नाही. सध्या कोपरगाव तालुक्यातील नगदवाडी सोनेवाडी परिसरात चिमुकले पुण्याचा आनंद घेताना दिसत आहे.
परिसरात गोदावरी कालव्याला जवळपास सात किलोमीटरचा वळसा असल्याने या परिसरातील मुलांना पाट पाणी दर महिन्याला वाहताना दिसते. मात्र उन्हाळ्यात अंगाची लाही लाही होत असते व ही क्षमवण्यासाठी शाळेतील विद्यार्थी मुलं थेट गोदावरी कालव्यात पोहण्याचा आनंद लुटतात. शहरातील मुलांना स्विमिंग टॅंक मध्ये पोहण्याचे धडे दिले जातात त्यासाठी पालकांना मोठा आर्थिक खर्च उचलावा लागतो. मात्र ग्रामीण भागात वरदान ठरलेल्या या पाट पाण्यामुळे मुले आपोआपच पोहण्याचे तंत्र अवगत करतात.या परिसरात जवळपास 90 टक्के ग्रामस्थ व मुलांना पोहता येते असा निष्कर्ष काढता येतो.
सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत परिसरातील मुले टप्प्याटप्प्याने या परिसरात पोहण्याचा आनंद लुटतात. मुलावर लक्ष ठेवण्यासाठी ज्या त्या गल्लीतील एक पालक त्यांच्यासमवेत असतोच. या कारणाने मुलांचा व्यायामही होतो आणि मुलीचे सशक्त बनतात असे जानते मंडळी सांगत आहे .