नगर – एलआयसी एजंटस् नागरी सहकारी पतसंस्था, पुणे यांनी वारंवार लेखी विनंती करुनही माहिती न दिल्याच्याच्या निषेधार्थ संस्थेच्या कार्यालयासमोर, सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पतसंस्था विभाग यांच्या कार्यालसामोर दि. 30 जुलै 2024 पासून सविनय सत्याग्रह आंदोलन करण्याचा इशारा संस्थेचे सभासद प्रमोदकुमार छाजेड यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
एलआयसी एजंटस् नागरी सहकारी पतसंस्था यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एलआयसी पतसंस्थेच्या झालेल्या सभा व त्याचे इतिवृत्त मिळावे. ताळेबंद, नफा-तोडा पत्रक मिळावे. पोटनियमाची प्रत मिळावी, आमच्याकडून ग्रुप इन्शुरन्स पोटी पैसे घेऊन केलेल्या पॉलिसी बाबतची माहिती मिळावी. संगणक प्रणाली खरेदी केल्यावर त्यावर केलेल्या खर्चाची माहिती मिळावी.
मी वरील माहिती आपणाकडे सातत्याने संस्थेचा एक सभासद म्हणून पाठपुराव करुन मागत आहे. तरी आपण जाणिवपूर्णक सदरची माहिती देण्याचे टाळत आहे. तरी या संस्थेच्या हुकूमशाही कारभाराची माहिती न देण्याच्या कृत्याच्या निषेधार्थ संस्थेच्या शिवाजीनगर, पुणे तसेच सहकार आयुक्त व निबंधक – पतसंस्था विभाग, पुणे यांच्या कार्यालयासमोर दि. 30 जुलै 2024 पासून सविनय सत्याग्रह करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनाच्या प्रती, मुख्यमंत्री, सहकार आयुक्त व निबंधक-पतसंस्था विभाग, पुणे, पोलिस आयुक्त व पोलिस निरिक्षक, पुणे यांना पाठविण्यात आल्या आहेत.