एस. एस. जी. एम . कॉलेजच्या प्राचार्य पदी -डॉ. माधव सरोदे

0

कोपरगाव- रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव प्राचार्य पदी डॉ. माधव  तुकाराम सरोदे यांची नियुक्ती झालेली आहे. डॉ. सरोदे हे रयत शिक्षण संस्थेत १९९० पासून प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयातून त्यांनी ३४ वर्ष अध्यापनाचे काम केले आहे. ते एम. एस्सी. पीएच.डी असून उत्तम संशोधक आहेत. रयत शिक्षण संस्थेचे व्हा.चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले. तसेच महाविद्यालय विकास समितीचे सर्व सदस्य व रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सर्व सदस्य यांनीही डॉ. सरोदे यांचे हार्दिक अभिनंदन केले.

डॉ. सरोदे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे भौतिकशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळाचे ते सदस्य आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या पुणे, कर्जत, पनवेल, अहमदनगर या महाविद्यालयात त्यांनी अध्यापनाचे काम केले आहे. त्याचप्रमाणे रयत शिक्षण संस्थेच्या राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहमदनगर व महात्मा फुले कॉलेज पिंपरी चिंचवड, पुणे येथे त्यांनी प्रभारी प्राचार्य म्हणूनही काम पाहिले आहे. २०१० मध्ये त्यांना यू.जी.सी.  नवी दिल्ली टीचर फेलोशिप मिळालेली होती. ‘सिंथासिस अँड डिपॉझिशन ऑफ नॅनो क्रिस्ट लाईन टिटॅनियम डाय-ऑक्साइड फिल्म फॉर सेन्सीटाईझड  सोलर सेल’  या विषयावर त्यांचे पीएच.डी चे संशोधन झालेले आहे.

 ‘अ स्मार्ट डिजिटल स्टाप्लर’ या संशोधनास त्यांना पेटंट प्राप्त झालेले आहे. त्यांचे वेगवेगळ्या विषयावरील १४ संदर्भ ग्रंथ प्रकाशित आहेत. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामध्ये त्यांचे  ४९ च्या वर शोध निबंध प्रकाशित झालेले आहेत. मुंबई विद्यापीठ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एफ. वाय. बी.एस्सी, एस. वाय. बी.एस्सी व टी. वाय. बी.एस्सी या वर्गाचे अभ्यासक्रम तयार करण्यामध्ये त्यांच्या मोलाचा  वाटा आहे. महात्मा फुले महाविद्यालय पनवेल येथे २०१३ ते २०१७ मध्ये ‘बेस्ट परफॉर्मन्स ऑफ द अॅकॅडमीक इयर’ हा बहुमान त्यांना मिळालेला आहे .

रयत शिक्षण विविध  महाविद्यालयाच्या संख्यात्मक आणि गुणात्मक विकासासाठी आणि विस्तारासाठी ते आपले योगदान दिलेले आहे. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक, पालक व विद्यार्थी यांनी त्यांचे हार्दिक स्वागत केले व शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here