एस.एस.जी.एम. महाविद्यालयाचे सर्व शिक्षकेतर सेवक दि.14 मार्च 2023 पासून बेमुदत संपावर

0

कोपरगांव : येथील एस.एस.जी.एम. महाविद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना (समन्वय समिती) महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनाने व महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ यांच्या निर्देशानुसार एस. एस. जी .एम. महाविद्यालयातील स्थानिक संघटना दिनांक १४ मार्च २०२३ पासून बेमुदत संपावर गेल्याची माहिती कार्यालयीन अधीक्षक सुनील गोसावी यांनी दिली.
गोसावी पुढे म्हणाले की महाराष्ट्र शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. परंतु आम्हाला न्याय मिळाला नाही तरी आम्ही २ फेब्रुवारी २०२३ पासून विद्यापीठ परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकलेला आहे व हा संप पुढे चालू ठेवत आम्ही १५ फेब्रुवारी २०२३ रोजी आम्ही महाविद्यालय प्रवेशद्वारासमोर निदर्शने केली व दि.१६ फेब्रूवारी ला एक दिवशीय लाक्षणिक संप करून सरकारचे लक्ष वेधले होते. परंत सरकारने कुठलीही भूमिका स्पष्ट केली नाही म्हणून दि. २० फेब्रुवारी २०२२ रोजी बेमुदत संप करून पण शासनाने कुठलीही मागणी लिखित स्वरूपात न दिल्यामुळे आम्ही दि.14 मार्च 2023 पासून बेमुदत संपावर गेलेलो आहोत. कुठलीही ठोस मागणी मान्य न झाल्याने आज संपाच्या दुसऱ्या दिवशीही आमच्या मागण्यासाठी हा संप आम्ही पुढे चालू ठेवणार आहोत. कार्यालयीन सेवकांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना कायम ठेवणे, १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग निश्चिती करणे व महाविद्यालयीन रिक्त जागा भरण्यास सरकारने परवानगी देणे, २००५ नंतरची जुनी पेन्शन योजना सेवेत रजू असलेल्या कर्मचाऱ्यांना लागू करून कालबाह्य पदोन्नती १०-२०-३० अशी चालू करणे यासारख्या मागण्यांच्या घोषणा देत सेवकांनी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन केले. या संपामध्ये एस.एस.जी.एम. महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक सुनील गोसावी, बाळासाहेब साळवे, पवार एस.के. सागर कांबळे ,सतीश जाधव ,श्रीमती रेखा जानराव,प्रवीण मोकळ ,मोरेश बांगर, बाळासाहेब व्यवहारे ,म्हसाजी धोत्रे ,संजय कुदळे, सोमनाथ तारडे, भारत गोरे शिवाजी आरोटे, दिलीप दुशिंग, दीपक हंडोरे, हरिचंन्द्र जाधव, श्रीमती वैशाली कदम श्रीमती लता शिंदे आदीसह ५७ कर्मचारी संपामध्ये सहभाग असून या संपाला प्राचार्य, व्यवस्थापन मंडळ व प्राध्यापक संघटना ,विद्यार्थी ,पालक यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे. सरकारचे अद्याप कुठलेही ठोस आश्वासन दिलेले नाही व वेळ काढू पणा केलेला आहे आमच्या रास्त मागण्यासाठी हा संप आम्ही पुढे चालू ठेवणार आहोत. त्यानुसार महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत संपावर बसलेले आहे. आमच्या सर्व मागण्या मान्य करून शासनाने लवकरात लवकर कार्यवाही करावी व विद्यार्थ्याची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी संपकरी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here