कोपरगाव प्रतिनिधी : रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स महाविद्यालयात शुक्रवार दि. २१ मार्च २०२५ रोजी शै. वर्ष २०२४ -२५ या वर्षाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आयोजित केला आहे. सदर समारंभासाठी अहिल्यानगर येथील सुप्रसिद्ध उद्योजक, वक्ते व लेखक एन. बी. धुमाळ हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभणार आहे.
तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये अॅड. संदीप वर्पे (सदस्य, जनरल बॉडी रयत शिक्षण संस्था व सदस्य, महाविद्यालय विकास समिती) सौ. चैतालीताई काळे (सदस्य, महाविद्यालय विकास समिती), विवेक कोल्हे (सदस्य, महाविद्यालय विकास समिती), सुनील गंगुले (सदस्य, महाविद्यालय विकास समिती), महेंद्रकुमार काले (निमंत्रित सदस्य, महाविद्यालय विकास समिती), बाळासाहेब आव्हाड (निमंत्रित सदस्य, महाविद्यालय विकास समिती), डॉ. ज्ञानेश्वर वाकचौरे (निमंत्रित सदस्य, महाविद्यालय विकास समिती) यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
सदर कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून अॅड भगीरथ काका शिंदे (व्हा. चेअरमन रयत शिक्षण संस्था, चेअरमन- महाविद्यालय विकास समिती) लाभणार आहे. तरी जास्तीत जास्त रयतसेवक, प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी व विद्यार्थी – विद्यार्थिनींनी सदर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) माधव सरोदे यांनी केले आहे.