“वाणिज्य, अर्थशास्त्र आणि व्यवस्थापनातीलआधुनिक नवीन प्रवाह” (आरटीसीईएम.- 2025)” विषय
कोपरगाव प्रतिनिधी : श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स आणि संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथील येथील Commerce & Management, Economics, B.B.A.आणि IQAC विभागाच्या वतीने ‘Recent Trends in Commerce, Economics & Management” (RTCEM- 2025)’ या महत्त्वपूर्ण विषयावर मंगळवार, दि.१८ मार्च २०२५ रोजी आभासी प्रणालीद्वारे राष्ट्रीय ई- परिषद संपन्न झाली. या परिषदेमध्ये वाणिज्य, अर्थशास्त्र आणि व्यवस्थापनातील आधुनिक नवीन प्रवाह आणि वर्तमान स्थितीबाबत सखोल चर्चा करण्यात आली. विविध राज्यांतील तज्ज्ञ, अभ्यासक, संशोधक आणि विद्यार्थी यांनी सदर परिषदेमध्ये सहभाग घेतला.
या राष्ट्रीय ई- परिषदेचे प्रास्ताविक व उद्घाटनपर मनोगत प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी केले. त्यांनी आपल्या मनोगतात पाहुण्यांचे mस्वागत करून जागतिकीकरणामध्ये कॉमर्स, अर्थशास्त्र व व्यवस्थापन या तीनही संकल्पनांच्या नवीन प्रवाहांची आवश्यकता स्पष्ट केली. राष्ट्रीय ई- परिषदेला शुभेच्छा देताना रयत शिक्षण संस्थेचे व्हा.चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे यांनी ए. आय. तंत्रज्ञानाद्वारे, “मानव संसाधन व्यवस्थापन, अकाऊंटन्सी, हॉस्पिटॅलिटी, व्यवसाय अर्थशास्त्र, व्यवस्थापनातील अलीकडील कल, अर्थशास्त्र आणि व्यवस्थापन” या विषयी मार्गदर्शन केले.
उद्घाटन सत्राचे प्रमुख पाहुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र- कुलगुरू प्रो. (डॉ.) पराग काळकर यांनी मार्गदर्शन पर मनोगतात, “ई-कॉमर्सची संकल्पना, कॉमर्स, इकॉनॉमिक्स अँड मॅनेजमेंट 2025 मध्ये सर्वांशी जोडले जाणे, तंत्रज्ञानाची प्रगती, जागतिकीकरण, बदलती जागतिक मूल्ये आणि डिजिटल परिवर्तन, अर्थव्यवस्था आणि सायबर सुरक्षा, सिंगल मॅन्युफॅक्चरिंग, मल्टिपल मॅन्युफॅक्चरिंग पॉईंट आणि मल्टिपल स्टोरेज, सोर्सिंग आणि मॅन्युफॅक्चरिंगचे वैविध्य, पुरवठा साखळी, डिजिटल कामगिरी, पुरवठा साखळीचा प्रभाव, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बिग डेटा, डिजिटल अर्थव्यवस्थेवर प्रभाव या विषयी भाष्य केले.
सदर परिषदेत (डॉ.) फिलिप रॉड्रिग्ज ई. मेलो (सेंट झेवियर्स कॉलेज, मापुसा, गोवा),यांनी ‘व्यवस्थापनातील अलीकडील ट्रेंड्स’ या विषयावर मार्गदर्शन करताना “नेतृत्वाची उत्क्रांती, विविधतेचे वाढते महत्त्व, समता आणि व्यवस्थापन, वाढते लक्ष आणि शाश्वतता, कॉर्पोरेट सोशल मीडिया, तंत्रज्ञान, डिजिटल रूपांतरण, ऑपरेशनल कार्यक्षमता आणि खर्च व्यवस्थापन या घटकावर आभ्यासाकांचे लक्ष केंद्रित केले. डॉ.गौर गोपाल बनिक (अकाउंटंसी विभाग प्रमुख, गौहाटी कॉमर्स कॉलेज गुवाहाटी विद्यापीठ, आसाम) यांनी
“शिक्षण आणि संशोधनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर” या विषयावर भाष्य केले. डॉ. प्रवीण जाधव (विभागप्रमुख, इन्स्टिट्यूट ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर्स टेक्नोलॉजी, रिसर्च अँड मॅनेजमेंट, स्वायत्त विद्यापीठ, अहमदाबाद, गुजरात) यांनी “अर्थशास्त्रातील आधुनिक नवीन प्रवाह” या विषयावर मार्गदर्शन केले. तृतीय सत्रासाठी डी. जी. कॉलेज ऑफ कॉमर्स, सातारा येथील मा. डॉ.सुवर्णा कुरकुटे यांनी अध्यक्षपद भूषविले.व संशोधनातील तत्वे या विषयावर मनोगत व्यक्त केले. सदर इ परिषदेसाठी एकूण १०१ संशोधन लेख प्राप्त झाले
असून १२ अभ्यासकांनी आपले संशोधन पर लेख सादर केले. सदर परिषदेसाठी १४८अभ्यासकांनी सहभाग नोंदवला. राष्ट्रीय ई परिषदेच्या समारोप सत्रासाठी प्रमुख अतिथी लाभलेले
वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे, जी.एस.एम.कॉलेज पुणे येथील प्राचार्य डॉ.प्रमोद बोत्रे यांनी समारोपीय भाषण करताना ‘भारतीय अर्थव्यवस्थेतील आव्हाने’ या विषयावर मार्गदर्शन करताना, “औद्योगिक क्षेत्रातील दर,घरगुती खर्च, वाहने, वस्त्र,आंतरराष्ट्रीय गुंतवणूक, व्यावसायिक उपक्रम, जी.डी.पी.घसरण, वितरण साखळी, औद्योगिक आणि उत्पादन क्षेत्रातील वाढीव बंधने” या संकल्पना स्पष्ट केल्या.
सदर परिषदेच्या यशस्वीतेसाठी वाणिज्य, अर्थशास्त्र व बी.बी.ए. विभागातील प्राध्यापकांनी कठोर परिश्रम घेतले. सदर परिषदेसाठी डॉ. मोहन सांगळे, डॉ. बाबासाहेब शेंडगे, IQAC प्रमुख डॉ. निलेश मालपुरे उपस्थित होते. परिषदेचा गोषवारा डॉ.अर्जुन भागवत यांनी मांडला. व आभार प्रा. पूजा गव्हाळे यांनी मानले. या परिषदेतील विविध सत्रांचे सूत्रसंचालन प्रा. चैताली वाघ व प्रा. प्रतीक्षा संवत्सरकर यांनी केले. सदर परिषदेसाठी प्रा.डी.बी.वैराळ यांचे तंत्रसहाय्य लाभले.