एस जे एस रुग्णालयात ११ वर्षीय मधुमेह पिडीत मुलीवर यशस्वी उपचार

0

कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील श्री जनार्दन स्वामी रुग्णालयात SJS hospital येवला तालुक्यातील बोकटे येथील ईश्वरी कुऱ्हाडे ही ११ वर्षीय मुलगी बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी दाखल झाली होती. तिला घरी अचानक ताप आल्याने बोलता येत नव्हते. तिच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती. श्री जनार्दन स्वामी रुग्णालयातील बालरोग तज्ञ डॉ. अनंतकुमार भांगे यांनी या ११ वर्षे मुलीवर उपचार सुरू केल्याने तिला डायबिटीस diabetic girlअसल्याचे कारण स्पष्ट झाले. बेशुद्ध अवस्थेत असल्याने आय सी यु मध्ये उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले. तिला पाच दिवस व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आले व तीन वेळा डायलिसिस केले. रुग्णालयातील स्टाफ यांच्या अथक प्रयत्नाने तिला शुद्ध आल्याने बरे वाटू लागले. या ११ वर्षीय लहान मुलीवर उपचार महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत पूर्णपणे मोफत करण्यात आले.

आपली मुलगी सुखरूप ठीक झाल्याने तिच्या आई-वडिलांनी जनार्दन स्वामी रुग्णालयातील  डॉ.अनंतकुमार भांगे, एमडी मेडिसिन डॉक्टर सायली ठोंबरे, व स्टाफ चे आभार मानले. बरी होऊन रुग्णालयातून घरी जात असताना रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एल एस बागडे एम आर डी विभागाचे इन्चार्ज जॉन कोळगे, एन आय सी यू चे इन्चार्ज शरद अनारसे डॉ.सूरज गायकवाड, डॉ.कविता चौधरी,डॉ.भाग्यश्री अंबोरे,डॉ.कोमल शिंदे, डॉ.सचिन निकम,डॉ.अबोली वानखेडकर परिचारिका भक्ती सातपुते, आशा दळवी, परसिस,पूजा जाधव,यांनी ईश्वरीला शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here