ऐन दुष्काळात आमदार काळे यांनी तालुका वाऱ्यावर सोडला – संदीप देवकर 

0

कोपरगाव : मतदारसंघ दुष्काळात होरपळत असताना विद्यमान आमदार आशुतोष काळे हे जनतेला सामोरे जाण्यासाठी तयार नाहीत. कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात त्यांना रस नाही. तालुक्याला वाऱ्यावर सोडून आमदार काळे राजकीय खुर्चीच्या खेळात दंग आहेत. महत्वाच्या बैठकांना देखील तिकिटाचे डोहाळे त्यांना लागतात हे दुर्दैवी आहे. पाट पाण्याची अवस्था बिकट असताना झालेल्या आंदोलनात खुद्द आमदारांनी त्यांच्याच कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले होते ही वस्तुस्थिती आहे. वीज प्रश्नावर तर सुधाकर रोहोम यांनी काळेंची पगारी चमचेगिरी करू नये कारण त्यांच्या स्वतःचे कोकमठाण गावचे वीज सबस्टेशन,पाणी वितरण तलाव हे सौ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या कार्यकाळात झाले आहे. असा सणसणीत टोला टाकळीचे सरपंच संदीप देवकर यांनी रोहोम यांना लगावला आहे.

कानात बोटे घालून प्रश्न न ऐकणारे विद्यमान आमदार आहेत.शेतकरी मेटाकुटीला आला आहे.जनावरे आणि माणसे पाण्यासाठी व्याकूळ होण्याची स्थिती निर्माण झाली आहे.सौ.कोल्हे ताई यांच्या पाठपुराव्यामुळे निदान मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीची रक्कम शिंदे फडणवीस युतीच्या काळात तरतूद झाली.अलीकडे आयत्या डब्यात येऊन बसलेले काळे यांनी त्याचेही श्रेय घेऊन दुष्काळात आपली राजकीय पोळी भाजन्याचे काम केले आहे.

समन्यायी पाणी वाटप कायदा आमदार काळे यांच्याच वडिलांच्या काळात मंजूर झाला.२००५ साली शेतकरी उध्वस्त करण्याचे पाप या कुटुंबाने केले.ज्यांनी सत्ता मिळताच तालुका भकास करण्याचे पाप केले होते त्यांनी आता मागील पाच वर्षाचा हिशोब विचारल्यास त्याचेही उत्तर सबळपने देण्याची तयारी आमची आहे.मात्र सध्या तालुका दुष्काळात आहे.आमदार एक टंचाई आढावा बैठक घेण्याची हिमत दाखवत नाही की उदासीनता आहे हेच कळत नाही.टंचाई बैठक घ्या तालुक्यातील शेतकरी उपस्थित राहतील त्यांच्या समस्यांचे उत्तर विद्यमान आमदारांनी जनतेला देण्याची तयारी दाखवावी.

विजेचे सर्वाधिक सुरळीत कामकाज सौ.कोल्हे यांच्या कार्यकाळात झाले.जेवढ्या मोठ्या प्रमाणात विजेची समस्या आमदार काळे यांच्या कार्यकाळात आली तेवढी समस्या कधीच आली नव्हती.रात्री अपरात्री शेतकरी जीव धोक्यात घालून जीवन जगत आहे मात्र आमदारांना आणि त्यांच्या अज्ञानी चेल्यांना याचे सोयरसुतक नाही.ज्या सुधाकर रोहोम यांचे महत्व आता फक्त बातमी देण्या पुरते उरले आहे त्यांनी स्वतची पातळी एका महिला नेत्यांविरोधात बोलताना सांभाळावी अन्यथा मिळणारे प्रतिउत्तर हे अतिशय शेलक्या शब्दात मिळेल याची जाणीव ठेवावी. स्वतःच्या गावात उभारलेले सबस्टेशन आणि पाणी पुरवठा तलाव हे सौ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या कार्यकाळातील आहे त्यामुळे भविष्यात भेडसावणाऱ्या समस्या कशा निवारता येतील याची उपाययोजना त्यांनी आधी केली हे गावात डोकावले तर रोहोम यांना दिसेल असाही टोला देवकर यांनी लगावला आहे.

सौ. स्नेहलताताई कोल्हे यांच्यावर टीका करणारे हे विसरले असतील की माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी जलदुत म्हणून तालुक्यातील शेकडो बंधारे आणि पाणी प्रश्नावर कामे केली त्याचा आदर्श महाराष्ट्रात घेतला गेला.त्या धर्तीवर सौ.कोल्हे यांनी जलसंधारणाची कामे त्यांच्या कार्यकाळात केली त्यामुळे अद्यापही परिस्थिती आटोक्यात आहे.सुधाकर रोहोम हे दिल्या भाकरीचे आणि सांगितल्या कामाचे आहे त्यामुळे त्यांची अवस्था सर्वांना ठाऊक आहे – देवकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here