कोपरगाव : आज महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने संपुर्ण महाराष्ट्रात तहसिलदार यांना निवेदन देण्यात आली त्याचा एक भाग म्हणून आज कोपरगाव येथील तहसील कार्यालयात तहसिलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले की ओ बी सी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची काळजी घेऊन सरकारने ओबीसी समाजाला लेखी स्वरूपात हमी द्यावी व जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे यासाठी आज कोपरगाव येथील तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले
या निवेदनात म्हटले आहे की सध्या ओबीसी समाजाला आरक्षणा बाबत संभ्रम निर्माण झाला आहे अस्वस्थता असंतोष निर्माण झाला आहे महाराष्ट्रात 56% टक्के पेक्षा जास्त ओबीसी समाज असताना अवघे 27% टक्के आरक्षण आहे. त्यात 11% टक्के आरक्षण हे विशेष प्रवर्गांना दिलेले आहे. उर्वरित फक्त 16% आरक्षणात इतर जवळ जवळ 400 पेक्षा जास्त जातीचा समावेश करण्यात आला आहे. त्यात नॉन क्रिमिलियरची जाचक अट घालून ओ बी सी समाजावर जाणुन बुजुन अन्याय होत आहे. आमची पुर्वी पासुन मागणी आहे की जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी या पुर्वीच ओबीसी समाजाने पाठिंबा दिला आहे. परंतु ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता त्यांना 50% टक्के पेक्षा जास्त आरक्षण लागू करुन तो ठरवा ते विधायक लोकसभेत मंजूर करुन घ्यावे ते त्यांना द्यावे ही ओबीसी समाजाची मागणी आहे. फक्त ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी अन्यथा ओबीसी समाज तो अन्य सहन करणार नाही.
अशा अनेक प्रकारच्या मागण्यांचे निवेदन आज कोपरगाव महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने तहसिलदार यांना देण्यात आले.
या प्रसंगी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हा अध्यक्ष रमेश गवळी कोपरगाव तालुका अध्यक्ष राजेन्द्र जी वालझाडे शहर अध्यक्ष राजेन्द्र राऊत युवा जिल्हा उपाध्यक्ष युवराज सोनवणे जेष्ठ मार्ग दर्शक ज्ञानेश्वर लोखंडे सर प्रमोद कवाडे, भगवान शेठ आंबेकर, अशोकराव राऊत, सुनील सोनवणे तालुका उपाध्यक्ष गोरख देवडे, दिलीप नेवगे, चंद्रकांत मोरे, गौरव वालझाडे, शिवदास सोनवणे, राजेन्द्र राऊत, राजेंद्र सोनवणे, (गोविंद शेठ) विजय सोनवणे, मयुर राऊत, काशीनाथ चौधरी, अमोल सोनवणे त्याच बरोबर कोपरगाव शहरातील तालुक्यातील अनेक समाज बांधव उपस्थित होते राजेन्द्र वालझाडे यांनी आभार मानले