औषध आणतो सांगत वेटर मोटारसायकल घेवून फरार

0

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी 

                मेडिकल मधुन औषधे घेवुन येतो, थोडा वेळ मोटरसायकल द्या. असे सांगून रामेश्वर खिल्लारे या भामट्याने नवनाथ कटारे यांची मोटारसायकल घेऊन पसार झाल्याची घटना राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे घडली. 

           नवनाथ भानुदास कटारे, वय ३५ वर्षे, रा. ब्राम्हणी, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, नवनाथ कटारे यांच्याकडे होंडा कंपनीची शाईन मॉडेलची एम एच १७ सी एस ५३१६ असा नंबर असलेली मोटारसायकल आहे. 

             राहुरी ते शिगणापुर रोडवर ब्राम्हणी येथे हॉटेल शेतकरी या नावाने हॉटेल आहे. सदर हॉटेलवर रामेश्वर सिताराम खिल्लारे हा वेटर म्हणुन काम करतो. नवनाथ कटारे हे त्या हाँटेलवर सतत जात येत असल्याने त्यांची व रामेश्वर याची ओळख होती.होती नवनाथ कटारे हे त्यांची मोटारसायकल घेऊन हॉटेल शेतकरी येथे गेले होते. त्यावेळी त्यांनी मोटारसायकल हॉटेलच्या पार्किंगमध्ये लावली होती. त्यानंतर काही वेळात हॉटेलवर काम करणारा वेटर रामेश्वर सिताराम खिल्लारे हा नवनाथ कटारे यांना म्हणाला की, मला थोडा वेळ तुमची मोटारसायकल द्या, मी गावातुन मेडिकल मधुन औषधे घेवुन येतो. कटारे यांनी त्याला मोटारसायकल दिली. त्यानंतर आरोपी रामेश्वर खिल्लारे हा मोटारसायकल घेवुन पसार झाला. नवनाथ कटारे यांनी त्याचा शोध घेतला. मात्र तो मिळुन आला नाही. 

            घटनेनंतर नवनाथ भानुदास कटारे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरून आरोपी रामेश्वर सिताराम खिल्लारे, रा. जामठी, ता. सोनगाव, जि. हिंगोली, याच्यावर गून्हा रजि. नं. ७२४/२०२४ भादंवि कलम ४०६ प्रमाणे गून्हा दाखल करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here