संगमनेर : कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या ८ जनावरांची संगमनेर शहर पोलिसांनी सुटका केली. या जनावरांची किंमत १ लाख २० हजार रुपये आहे. मंगळवारी रात्री ८ वाजता शहरातील भारतनगर येथील कादरी मस्जिदच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये पोलिसांनी छापा टाकत ८ जनावरे ताब्यात घेतली. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिस नाईक सचिन कचरू उगले यांच्या फिर्यादीवरून जाफर उमर कुरेशी (भारतनगर, संगमनेर) याच्यावर शहर पोलिसांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस नाईक गायकवाड़ अधिक तपास करत आहे. ताब्यात घेतलेल्या ८ जनावरांची रवानगी कऱ्हे घाटातील पांजरपोळमध्ये करण्यात आली आहे.