कमिटमेंट देणं आणि पाळणं आम्ही बाळासाहेबांकडून शिकलो :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

मुंबई : “हा माझ्यासाठी महत्त्वाचा क्षण आहे. मी बाळासाहेबांना पुन्हा एकदा वंदन करतो. बाळासाहेबांनी कधी शब्द फिरवला नाही. आम्ही कमिटमेंट त्यांच्याकडून शिकलो”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. विधिमंडळात बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. शिवसेना प्रमुखांमुळे माझ्यासारखे असंख्य शिवसैनिक विधानसभा, विधानपरिषदेपर्यंत पोहोचू शकले.

भाषणात मुख्यमंत्री म्हणाले, “सगळ्यांनी भाषणात चौकार षटकार मारलेत त्यामुळे माझी पंचाईत झालीय. बाळासाहेबांच्या विचारांवर प्रेम करणा-या प्रत्येकासाठी हा क्षण अनमोल आहे त्याचं मोल करता येणार नाही”.

“एकेकाळी महाराष्ट्रात ठराविक घराण्यांची सत्ता होती. पण बाळासाहेबांनी सामान्य घरातल्या मुलांना संधी दिली. बहुसंख्य शिवसेनेच्या नेत्यांना राजकीय पार्श्वभूमी नाही. हे केवळ बाळासाहेबांनी केलं. नाहीतर एखाद्या शेतकऱ्याचा मुलगा राज्याचा मुख्यमंत्री कसा झाला असता. त्यांच्या विषयी बोलताना कंठ दाटून येतो. कारण त्यांच्यामुळे इथपर्यंत प्रवास झालाय”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

“बाळासाहेब ठाण्यात यायचे तेव्हा म्हणायचे मला ठाण्याची काळजी नाही इकडे एकनाथ शिंदे आहेत. गेली 25 वर्षं ठाण्यात बाळासाहेबांच्या शिवसेनेची सत्ता आहे. तुमच्यात धाडस आणि आत्मविश्वास असेल तर कोणी तुम्हाला रोखू शकत नाही. हे बाळासाहेबांनीच आम्हाला शिकवलं आहे. तुम्ही हे पाहतच आहात”

“अजितदादा म्हणाले ते खरंय, एकदा मुस्लीम बांधव मातोश्रीवर आले होते. त्यांचा नमाज पढण्याची वेळ दिली. बाळासाहेबांनी त्यांना जागा दिली. पण पाकिस्तानचे गोडवे जे गात होते त्यांच्याबद्दल मी बोलू शकत नाही. काही गोष्टी मी मुख्यमंत्री असल्याने बोलू शकत नाही.

मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी कधी विचारांशी तडजोड केलेली नाही. स्वत:ला काही पाहिजे म्हणून त्यांनी रिमोट कंट्रोल चालवला नाही याचे आम्ही साक्षीदार आहोत”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here