कर्जत / प्रतिनिधी : माजी मंत्री राम शिंदे यांनी विधान परिषदेत विचारलेल्या लक्षवेधी प्रश्नावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर देताना कर्जत चे प्रांत अधिकारी डॉ अजित थोरबोले व तहसीलदार नानासाहेब आगळे यांना निलंबित करण्यात आले आहे अशी घोषणा केल्याने कर्जत जामखेड तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कर्जत तालुक्यातील बेकायदेशीर चालू असलेली खडी क्रशर बाबत आ. राम शिंदे यांनी लक्षवेधी प्रश्न विचारला होता. त्या वर उत्तर देताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी बेकायदेशीर खडी क्रशर चालू होते व ते आता बंद करण्यात आले आहेत. या खडी क्रशर चालकांना ४८ कोटी रुपये दंड केला आहे अशी माहिती दिली होती. पंरतू आ. राम शिंदे यांचे या उत्तरने समाधान झाले नाही म्हणून राम शिंदे यांनी पुन्हा लक्षवेधी करून सरकारचे लक्ष वेधून
सरकारचा महसूल बुडवून बेकायदेशीर माळढोक पक्षी अभयारण्य च्या इकोसेसटिव्ह झोनमध्ये खडी क्रशर चालू असल्याचे लक्षात आणून देवून प्रांत डॉ अजित थोरबोले व तहसीलदार नानासाहेब आगळे यांना निलंबित करण्याची व बेकायदेशीर खडी क्रशर ची निवृत्त न्यायाधीश मार्फत संपूर्ण चौकशी ची मागणी केली होती.
लक्षवेधी सुचनेनुसार महसूल मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी आ. राम शिंदे यांनी विचारलेल्या लक्षवेधी सुचनेची दखल घेत प्रांत डॉ अजित थोरबोले व तहसीलदार नानासाहेब आगळे यांना निलंबित करण्याची घोषणा केली व या बेकायदेशीर खडी क्रशर बाबत निवृत्त न्यायाधीश मार्फत चौकशी केली जाईल असे जाहीर केले.