जामखेड तालुका प्रतिनिधी :- जामखेड मतदारसंघातील मौजे खंडाळा – पाटेगाव ता. कर्जत येथे बेरोजगार तरुणांसाठी अत्यावश्यक असणारी एमआयडीसी अधिसूचना सरकार काढत नसल्याच्या निषेधार्थ जवळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तसेच युवकांनी जामखेड तालुक्यातील जवळा गाव कडकडीत बंद ठेवले.एम .आय डी.सी ला अंतिम मंजुरी मिळावी या हेतूने बंदला युवक वर्गातून तसेच व्यापारी,छोटे ,मोठे दुकानदार तसेच हॉटेल , या सर्वच व्यावसायिकांनी प्रतिसाद देत दिवसभरासाठी दुकाने कडकडीत बंद ठेवली.
एम आय डी सी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध होईल तसेच विकासाच्या दृष्टीने कर्जत जामखेड मतदार संघामध्ये मोठया प्रमाणात आर्थिक उलाढाल होऊ शकते त्यामुळे कर्जत जामखेड बाजार पेट विकास होण्यास मदत होऊ शकते असे आंदोलकांचे मत आहे.परंतु भाजप विधान परिषदचे आमदार माजी मंत्री राम शिंदे या एम आय डी सी ला राजकीय षडयंत्र रचून सत्तेचा दुरुपयोग करत एम आय डी ला खीळ घालत श्रेवाद निर्माण करत आहे असे आ.रोहित पवार यांचे म्हणणे असल्याने आ.रोहित पवार यांनी पावसाळी अधिवेशन सुरू असताना एम आय डी सी ला अंतिम मंजुरी मिळावी या साठी विधान भवन आवारात पावसात आंदोलन केले सरकारने आ.रोहित पवार यांच्या आंदोलनाची दखल घेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तातडीने एम आय डी सी चा प्रश्न मार्गी लाऊ असे अश्वासन देत आंदोलन मागे घ्यावा असे सांगितले परंतु आज अखेर प्रश्न मार्गी लागला नसल्याने कर्जत जामखेड च्या जनतेने, युवकांनी ,व्यावसायिक व व्यापारी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त करत विविध ठिकाणी रास्ता रोको ,आंदोलने सुरू असुन नागरिकांनी जवळा गाव कडकडीत बंद ठेऊन सरकारचा निषेध केला .