शेतकरी सेनेच्या उत्तर जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र लोंढेची निवड
देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
राज्यभर दौरा करून शेतकऱ्यांचे मेळावे घेणार.शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आवाज उठवणार आहे.महायुती सरकारमध्ये पक्ष सहभागी असला,तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष करणार आहे.असे शिवसेनेच्या शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष धनंजय जाधव यांनी सांगितले. देवळाली प्रवरा येथिल राजेंद्र काशिनाथ लोंढे यांची शेतकरी सेनेच्या उत्तर जिल्हाध्यक्षपदी निवड केल्याची घोषणा करण्यात आली. राहुरी तालुका दूध संघाचे अध्यक्ष तान्हाजी धसाळ, शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुधाकर कराळे, मनोज आगे, सर्जेराव जाधव व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी जाधव म्हणाले की, शिर्डी लोकसभा मतदारसंघात शेतकरी सेनेच्या माध्यमातून राजेंद्र राजेंद्र लोंढे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संघर्ष करावा.त्यांनी कामाच्या माध्यमातून राज्यात स्वतःची ओळख निर्माण करावी. शेतकऱ्यांची कर्जमाफी काळाची गरज आहे.सन २००६- ०७ मध्ये ७० हजार कोटींच्या कर्जमाफीनंतर फक्त घोषणा झाल्या.एकही मोठी कर्जमाफी झाली नाही. शेतमालाच्या उत्पादन खर्चात वाढ, निसर्गाच्या अवकृपेमुळे घटणारे उत्पादन,तुलनेत कमी मिळणारे शेतमालाचे भाव, अशा चक्रव्यूहात शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकला आहे. शेतकऱ्यांना स्वतःच्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर व्यापक लढा उभारणार आहे, असे जाधव यांनी सांगितले.
यावेळी विनायक भुसारे, सदाशिव उंडे, बाळासाहेब दोंड, सुभाष वाघ,सचिन ढूस, अनंत कदम, अँड. प्रशांत मुसमाडे, संजय कदम, प्रदीप तोडमल,नामदेव चव्हाण, सुभाष पठारे, कैलास कोतकर, सुभाष लोंढे, रवींद्र लोंढे, शिरीष लोंढे, निकेत कदम, अभिजित लोंढे, शुभम लोंढे, प्रदीप महांकाळ, दीपक भांड, आदिनाथ कडू, मयूर भोसले आदींसह शेतकरी उपस्थित होते.