कोळपेवाडी वार्ताहर :- राज्यातील साखर कारखान्यांना मार्गदर्शन करणारी व साखर उद्योगात अग्रेसर असलेली शिखर संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (मांजरी बु.) यांच्या मार्फत राज्यातील सहकारी व खाजगी साखर कारखान्यांना गळीत हंगामात सर्वोत्कृष्ठ कामगिरीबद्दल दरवर्षी पुरस्कार प्रदान करण्यात येतात. त्यानुसार कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्यास गळीत हंगाम २०२३/२४ मध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मध्य विभागातून द्वितीय क्रमांकाचा ‘तांत्रिक कार्यक्षमता’ पुरस्कार (दि.२३) रोजी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय.)च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला आहे.
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक मा.आ.अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व कारखान्याचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांच्या कुशल नेतृत्वाखाली सन २०२२/२३ व २०२३/२४ या दोन गळीत हंगामात कारखान्याचे पहिल्या व दुसऱ्या टप्यात आधुनिकीकरण व विस्तारीकरण यशस्वीपणे पूर्ण केले. व सपूर्ण उभारलेली नवीन मशिनरी वेळेत कार्यान्वित करून गाळप हंगामात कोणताही व्यत्यय येणार नाही याची काळजी घेवून कार्यक्षमतेने चालविली.त्यामुळे मिलमधील ऊसाचा तंतुमय निर्देशांक ८८.२०%, रेड्युस मिल एक्सट्रॅक्शन (आरएमई) ९६.२०%,प्रायमरी एक्सट्रॅक्शन ७४.५०%, बगॅस बचत ८.५४ %, साखर तयार करण्यासाठी लागणाऱ्या स्टीमचा वापर ३५ टक्के, साखर तयार करण्यासाठी लागणाऱ्या विजेचा वापर २४ किलो वॅट प्र.मे.टन व गाळप बंद कालावधीचे प्रमाण ०.३८ टक्के राखले. हे तांत्रिक निकष तंतोतंत पाळल्यामुळे कारखान्याला मध्य विभागात ‘तांत्रिक कार्यक्षमता’ द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार माजी केंद्रीय कृषी मंत्री व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्ही.एस.आय) चे अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार व राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या हस्ते सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.शिवेंद्रराजे भोसले, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील,आ.जयंतराव पाटील, नॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष मा.आ.हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार कारखान्याचे उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण, सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक सुनील कोल्हे यांनी स्विकारला. यावेळी संचालक सूर्यभान कोळपे, राजेंद्र घुमरे, दिलीपराव बोरनारे, राहुल रोहमारे, अनिल कदम, वसंतराव आभाळे, श्रीराम राजेभोसले, दिनार कुदळे, अशोक मवाळ, सुनील मांजरे, मनोज जगझाप, प्रवीण शिंदे,गंगाधर औताडे, श्रावण आसने, विष्णू शिंदे, सुरेश जाधव,कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक सुनील कोल्हे, आसवणी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबा सय्यद,फायनान्स मॅनेजर सोमनाथ बोरनारे, चीफ इंजिनिअर निवृत्ती गांगुर्डे, चीफ केमिस्ट सुर्यकांत ताकवणे आदी मान्यवर उपस्थित होते.