कोपरगाव : शालेय माध्यमिक शिक्षण घेतांना आपल्या आवडीचे पदवी शिक्षणाची निवडीचा विचार करणे महत्त्वाचे आहे. कल्पना चांगल्या असल्या की ईच्छाशक्तीच्या जोरावर आवडीचे कुठलेही ध्येय सहज सोपे होते. असे मार्गदर्शन राष्ट्रीय डिझाईन संस्था (NID)आंध्र प्रदेशच्या विद्यार्थीनी राजहंस मंदार आढाव शालेय विद्यार्थ्यांना तासिका दरम्यान केले.
वैद्यकीय, अभियांत्रिकी, वकीली, शिक्षण या व्यतिरिक्त उच्च शिक्षणासाठी असंख्य दालने खुली आहेत. मराठी माध्यमातून शिक्षण घेणा-या जनसामान्य मुले-मुली माध्यमिक शिक्षणानंतरही अनभिज्ञ असतात. अशा प्रसंगी योग्य वेळी योग्य दिशादर्शक मार्गदर्शन मिळाले तर ही मुले आपल्या आवडीच्या प्रगतीची उत्तुंग शिखरे गाठू शकतात. या करिता आंध्र प्रदेश येथील राष्ट्रीय डिझाईन संस्थेच्या विद्यार्थीनी राजहंस मंदार आढाव यांचे शालेय विद्यार्थ्यांना विशेष तासिकेचे आयोजन करण्यात आले होते. विद्याप्रबोधीनी शाळा, एस. जी. विद्यालय येथे राजहंस आढाव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आंध्र प्रदेश येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन ही भारतातील अग्रगण्य संस्था मानली जाते. जागतिक स्तरावर या संस्थेचा ६ वा क्रमांक लागतो. संपूर्ण जगभरातून लाखो विद्यार्थी येथे अर्ज करतात. या पैकी ४२५ विद्यार्थी कोटा निश्चित आहे. या करिता घेण्यात येणाऱ्या कौशल्यपूर्ण बौध्दिक चाचणीत विद्यार्थी निवडले जातात. यात राजहंस आढाव या विद्यार्थीनिने प्रवेश मिळाला आहे.हे यश संपादन करतांना तीचे आजोबा अॅड. शंकरराव आढाव, आजी सौ. रंजनाताई आढाव यांचे मार्गदर्शन तर आई जान्हवी आणि वडील मंदार यांचे पाठबळ असल्याचे तिने सांगितले. आपल्या कोपरगांवातील जनसामान्यांच्या शाळेतील मुलांना शिक्षणक्षेत्रातील ही दालनं माहिती व्हावी. या भावनेतून विविध शाळांमध्ये तिचे मार्गदर्शन आणि विद्यार्थी संवादाचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रीय डिझाईन संस्था (NID) सह विविध पदवी शिक्षणासाठी काय करावे याची प्राथमिक माहिती राजहंस आढाव हीने विद्यार्थी यांना दिली. तसेच पालकांच्या घरची परिस्थिती बेताची असेल तर पदवी शिक्षणासाठी कर्ज उपलब्ध होते. यावरही माहिती दिली.
या प्रसंगी एस. जी. विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश गायकवाड, विद्याप्रबोधीनीचे मुख्याध्यापक दत्तात्रेय गवळी, मुख्याध्यापिका माधुरी कुलकर्णी यांनी राजहंस आढाव हीचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. या प्रसंगी एस. जी. विद्यालयाचे शिक्षक सुरेश गोरे,रघुनाथ लकारे,अतुल कोताडे,श्वेता मालपुरे तसेच विद्याप्रबोधीनीच्या शिक्षिका सिमा हिरे,मनिषा भास्कर, नितीन शेटे,श्रध्दा शिंदे आदींसह एस. जी. विद्यालय आणि विद्या प्रबोधिनी शाळेतील इ. ९वी,१० वी चे विद्यार्थी विद्यार्थांनी उपस्थित होते.