काकडी ग्रामपंचायतीचा वीजपुरवठा तात्काळ सुरळीत करा- सौ. स्नेहलताताई कोल्हे 

0
फोटोओळी-कोपरगांव- काकडी ग्रामपंचायतीचा वीजपुरवठा तात्काळ सुरळीत करा अशा सुचना भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी दिल्या. (छाया - जय जनार्दन फोटो, संजीवनी.)

कोपरगांव :- दि. ९ जानेवारी

            काकडी ग्रामपंचायतीचा वीजपुरवठा तात्काळ सुरळीत करा अशा सुचना भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी दिल्या. तालुक्यातील काकडी ग्रामपंचायतीत सोमवारी राहाता वीज वितरण कंपनीचे उपअभियंता डी डी पाटील यांच्या समवेत वीजेच्या प्रश्नाबाबत बैठक घेण्यांत आली. याप्रसंगी मल्हारवाडी, डांगेवाडी, रांजणगांव देशमुख, बहादराबाद, मनेगांव येथील कार्यकर्ते उपस्थित होते. 

          काकडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पुर्वा गुंजाळ यांनी प्रलंबित वीज समस्यांचा पाढा वाचला. याप्रसंगी उपसरपंच भाउसाहेब सोनवणे, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, विलास डांगे, भिमराज गुंजाळ, वाल्मीक कांडेकर, प्रमोद शिंदे, कानिफ गुंजाळ, अशोक गुंजाळ, बाबासाहेब सोनवणे, सुनिल कांडेकर, प्रकाश गोर्डे यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. काकडी पंचक्रोशीत सध्या वीजेच्या मोठया समस्या आहेत त्यामुळे पुर्ण दाबाने वीज मिळत नाही, परिणामी वीज उपकरणे सुरळीत चालत नाही. सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी अनेक ठिकाणी असलेले विद्युत जोड बदलावे, को-हाळे वीज उपकेंद्र व काकडी विमानतळ अंतर्गत वीज प्रश्नांची सोडवणुक करावी. मनेगांव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आवारातील वीज जोड बदलणे आदि सुचना केल्या. याप्रसंगी काकडी विमानतळ टॅक्सी चालकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत चर्चा करण्यांत आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here