कारखाना हिताच्या आड येणाऱ्यांना येत्या निवडणुकीत जनता धडा शिकवेल – विवेक कोल्हे

0

राहाता ;  कारखाना चांगला चालला पाहिजे यासाठी विविध माध्यमातून सहाय्य उभे करण्याचा  प्रयत्न असतो त्यासाठी राजकीय पाठबळ गरजेचे असते कारण त्याशिवाय अनेक अडचणी येतात.यापुढे जो गणेश कारखाना हिताच्या आड येईल त्याला येत्या निवडणुकीत धडा जनता शिकवेल असा इशारा विवेक कोल्हे यांनी विरोधकांना दिला .

 

श्री गणेश सहकारी साखर कारखाना ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.  त्यावेळी ते बोलत होते . यावेळी माजी महसूलमंत्री आ.बाळासाहेब थोरात,जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे,प्रभावती ताई घोगरे,चेअरमन सुधीर लहारे, व्हा.चेअरमन विजय दंडवते व सर्व आजी माजी संचालक मंडळ,लताताई डांगे,सुधीर म्हस्के, गंगाधर चौधरी, शिवाजी लहारे,चंद्रभान गुंजाळ,नानासाहेब गव्हाणे,चंद्रभान धनवटे, सर्जेराव जाधव,बलराज धनवटे,महेंद्र शेळके,रामचंद्र बोठे,उत्तम मते,भाऊसाहेब थेटे, संजय सरोदे,डॉ.वसंत लबडे, उत्तमराव घोरपडे,प्रकाश मोठे,अविनाश दंडवते,विक्रांत दंडवते आदींसह अधिकारी,सभासद,शेतकरी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना आ. बाळासाहेब थोरात म्हणाले राजकीय विरोधक कितीही अडथळे आणत असतील तरी कारखाना यशस्वी आपण चालवून दाखवला या पुढे देखील ताकतीने चालवू..माझ्यावर समन्यायीचा आरोप करणारे तेव्हा कुठे होते ? मंत्रिमंडळात तुम्ही होतात मग का नाही बोललात ? या उलट संगमनेर मधून आम्ही भूमिका घेतली समन्यायी बद्दल विरोध दर्शविला होता. महसूलमंत्री असताना आम्ही खोट्या केसेस करून लोकांना जेल मधे टाकले नाही तर जे सत्य असेल तेच काम केले..गणेश कारखाना इतिहास का घडला हे विसरू नका कारण जर आपण ते विसरलो तर पुन्हा सगळं जैसे थे होईल आणि निवडणुकीच्या तोंडावर एम आय डी सी सारख्या तात्पुरत्या वल्गना हे करतील.खर तर मुळात शिर्डीचे रुग्णालय का कमी पडले याचा अभ्यास केला तर विरोधकांचे खरे कारनामे उघड होतीस अशी टीका आ. बाळासाहेब थोरात यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांचे नवा न घेता केली .

विवेक कोल्हे यांनी गणेश कारखान्याचे जुने साहित्य पूर्वीच्या काळात कसे विकले गेले असे दाखवले याची चौकशी करण्यासाठी तक्रार केलेली आहे.कारखाना जिल्ह्यात सर्वोत्तम चालावा यासाठी प्रयत्नशील आहे.ऊस वाढीसाठी सभासदांनी मोहीम हातात घेऊन जास्तीत जास्त ऊस वाढवला पाहिजे.जिल्ह्यात सर्वाधिक साखर उतारा घेणारा कारखाना आपण करून दाखवला कारण सर्वांची जिद्द होती.मागील कालखंडात काय राजकारण झाले हे सर्वांना ठाऊक आहे कसे कसे अडचणी निर्माण केल्या गेल्या हे सर्वांना ज्ञात आहे.संस्था नफ्यात येण्यासाठी आपली सामूहिक शक्ती महत्वाची आहे.असेही कोल्हे म्हणाले . 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here