कृत्रिम दुधासह भेसळ बंद झाल्यास दुधाला 50 रुपये भाव मिळेल; लांबे

0

रास्ता रोको आंदोलन म्हणजे भाषणबाजी व राजकीय स्टंट 

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी 

             गेल्या आठवड्यात दूध दरवाढ व इतर मागण्यांसाठी राहुरीत झालेले रास्ता रोको आंदोलन व भाषणबाजी हा निव्वळ राजकीय स्टंट असून,जखम डोक्याला व मलम गुढग्याला याप्रमाणे राजकीय नेते व कार्यकर्ते हे दूध भेसळीबाबत काहीच बोलले नाहीत,अशी टिका करीत दुधातील भेसळ थांबल्यास दुधाला प्रतिलिटर ५० रुपये भाव सहज मिळू शकेल, असे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे यांनी सांगितले.

              लांबे  पुढे  म्हणाले, शेतमालाच्या भावाबाबत आंदोलन करणाऱ्यांना शेतकऱ्यांचे कुठलेही देणेघेणे नाही.निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हा फक्त शेतक-यांच्या मतासाठी राजकिय स्टंट आहे,सध्या कांद्याला 3 हजारापर्यत भाव आहे,सत्ता पक्षाने चालु अधिवेशनात दुधभाव व अनुदान जाहीर करुण नविन योजणा जाहीर केल्या तरी आंदोलण,म.वि.आ सरकारच्या काळात शेतकरी वर्ग कोरोणा व अतिवृष्टी या कारणाने आर्थीक अडचनीत असताना ऊर्जा राज्यमंत्री यांनी शेतक-यांची शेतीपंपाची चालु लाईट बंद करुण थकबाकीच्या नावाखाली सक्तीची विजबील वसुली करणारांनी शेतक-यांच्या प्रश्नावर नौटंकी आंदोलन करुण स्टंट बाजी करुण शेतक-यांची दिशाभुल करु नये असा आरोप शेतकरी नेते सुरेशराव लांबे पाटील यांनी केला,

           पुढे लांबे म्हणाले प्रस्थापित मंडळीच्याच नाकर्तेपणामुळेच शेतीधंदा धोक्यात आला आहे.अनेक वर्षापासुन शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग दुग्ध व्यवसायाकडे वळाला.मात्र या व्यावसायालाही दूध भेसळ करणाऱ्या महाभागांची दृष्ट लागली.काही बड्या नेते मंडळीच्या आशिर्वादानेच अनेक दुधभेसळखोर स्वहीतासाठी मोठ्या प्रमाणात दुधात भेसळ करून निष्पाप नागरिकांसह लहान लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आणले जात असताना यात खरा दूध उत्पादक नाहकच बदनाम झाला.या दूध तस्करांवर सरकारने व अन्न व औषध भेसळ विभागाने कठोर कारवाई करावी,त्यामुळे दुध अतिरीक्त होणार नाही,ख-या दुधउत्पादकाला 50 रुपया पर्यत भाव मिळेल व आरोग्याचाही प्रश्न निर्माण होणार नाही,असा सुचक इशारा सत्तापक्षासह विरोधकांना शेतकरी नेते लांबे पा यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here