अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिसपासून 12 किमी दूर असलेल्या मॉंटेरी पार्कजवळ गोळीबार झाला. चिनी नव वर्षानिमित्त सुरू असलेल्या कार्यक्रमानिमित्त अनेक जण या ठिकाणी जमा झाले होते.
पोलिसांनी अद्याप जखमींची आकडेवारी सांगितली नाही. या गोळीबाराचा उद्देश अद्याप माहीत नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मोंटरी पार्क या ठिकाणी बहुतांश लोक हे आशिआई समुदायाचे आहेत. हल्लेखोराला अद्याप अटक झालेली नाही. तो एक पुरुष असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पण अमेरिकेत आता अशा अंदाधुंद गोळीबाराच्या सातत्याने ऐकू येतात. देशात सहज उपलब्ध होणाऱ्या बंदुकींविरोधात कायदा आणावा, म्हणून वेळोवेळी मागणीही उठत असते. मात्र या घटना काही कमी होताना दिसत नाहीत.
1.अमेरिकेत किती प्रकारच्या बंदुका मिळतात?
लष्करी पद्धतीची हत्यारं अशाप्रकारच्या गोळीबाराच्या घटनांसाठी कारणीभूत ठरतात, असं म्हटलं जातं. अमेरिकेत सध्या चलनात असलेल्या शस्त्रास्त्रांपैकी सर्वाधिक 64 टक्के हँडगन्स आहेत. त्याखालोखाल 4 टक्के रायफल्स, 2 टक्के शॉटगन्स आणि अन्य 2 टक्के असे बंदुकांचे प्रकार आहेत. याव्यतिरिक्त उर्वरित 28 टक्के शस्त्रांची माहितीच नसल्याचं आकडेवारी सांगते.