कोपरगाव : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व के.जे.सोमय्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव तालुक्यातील डाऊच बु. येथे दि. ९ जानेवारी ते १५ जानेवारी २०२३ या काळात राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शिबिराची थीम युवकांचा ध्यास ग्राम -शहर विकास अशी होती. शिबिराचा समारोप दिनांक १५ जानेवारी २०२३ रोजी झाला. या समारोप प्रसंगी के.जे. सोमय्या महाविद्यालयाच्या महाविद्यालय विकास समितीचे सदस्य कांतीलाल वक्ते हे उपस्थित होते. तसेच गोदामाई प्रतिष्ठानचे संस्थापकीय अध्यक्ष आदिनाथ ढाकणे आणि डाऊच बुद्रुक गावचे सरपंच दिनेश गायकवाड, उपसरपंच भीवराव दहे तसेच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते तसेच गावचे ग्रामस्थ व निवृत्त सैनिक गायकवाड साहेब हे उपस्थित होते .
आपल्या मनोगतात बोलताना कांतीलाल वक्ते म्हणाले की स्वयंसेवकांनी स्वतःच्या व्यक्तीमत्वाचा विकास करायचा असेल तर एनएसएस शिबिरासारखे दुसरे प्रभावी साधन नाही. एनएसएस शिबिराच्या माध्यमातून स्वयंसेवकांनी स्वतःचा विकास करून पर्यावरणाचे संरक्षण करावे जागतिक तापमानवाढ, तापमान बदल त्याचबरोबर नदीचे प्रदूषण यासारख्या अनेक समस्या आपल्याला भेडसावत आहेत व भविष्यातही भेडसावतील, यावरती उत्तम उपाय म्हणून प्रत्येकाने वृक्षारोपणाचा ध्यास घेतला पाहिजे आणि त्यासाठी सदैव वृक्षारोपण हे केलेच पाहिजे. कोपरगाव मध्ये कोपरगाव ग्रीन फोरम या नावाने एक एनजीओ स्थापन करून आम्ही हे वृक्षारोपणाचे काम हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गोदामाई प्रतिष्ठानचे संस्थापकीय अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी आपल्या मनोगतात आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की एनएसएस हे स्वयंसेवक घडवण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. आणि या माध्यमातून माणूस खऱ्या अर्थाने उत्कृष्ट स्वयंसेवक बनतो असा माझा विश्वास आहे, आणि मला गोदामाईची सेवा करण्याची जी प्रेरणा मिळाली ती प्रेरणा मी एनएसएसच्या माध्यमातूनच घेतली आहे. आज जो मी या ठिकाणी आहे तो मी एनएसएसमुळेच आहे. मी म्हणण्यापेक्षा आम्ही मिळून काम करू असं म्हणणं हे केव्हाही मोठे काम आहे . हि गोदामाई स्वच्छ करण्याची योग्यता माझ्यामध्ये नाही परंतु सेवा करण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे असे मी या ठिकाणी मुद्दामहून नमूद करतो. त्याचबरोबर डाऊच बु. या गावचे उपसरपंच भीवराव दहे यांनीही उपस्थित स्वयंसेवकांना आपल्या वक्तव्यातून शुभेच्छा दिल्या व स्वयंसेवकांनी गावासाठी केलेल्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.तसेच भविष्यातील पुढील दोन वर्ष आम्ही तुमच्यासाठी अशाच पद्धतीचा सहकार्य करू असं त्यांनी जाहीर केलं. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक डॉक्टर बी एस गायकवाड यांनी शिबिरादरम्यान केलेल्या कामाचा अहवाल उपस्थितांसमोर मांडला व गावाने केलेल्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले.डाऊच बु. गावचे सरपंच दिनेश गायकवाड, उपसरपंच भिवराव दहे व ग्रामपंचायत सदस्य यांनी कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.बी.एस. गायकवाड,प्रा. डॉ. एस. एस. नागरे,प्रा. येवले मॅडम यांचा सत्कार केला. या कार्यक्रमासाठी प्रेरणादायी म्हणून कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे,सचिव संजीवजी कुलकर्णी, के. जे. सोमैया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी एस. यादव,उपप्राचार्य डॉ. एस. आर.पगारे, महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रो.डॉ. व्ही.सी. ठाणगे,महाविद्यालयाचे प्रबंधक डॉ. अभिजीत नाईकवाडे व कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटीचे सर्व सदस्य यांचे मौलिक मार्गदर्शन मिळाले. तसेच कार्यक्रमाला यशस्वी तिकडे नेण्यासाठी कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. बी. एस. गायकवाड प्रा. डॉ. एस. एस.नागरे ,प्रा. येवले मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. या शिबिरामध्ये स्मशानभूमी स्वच्छता, ग्राम स्वच्छता ,ग्राम सर्वेक्षण,सामाजिक ज्वलंत प्रश्नावरती पथनाट्य, राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर व्याख्यान, दुपारची व्याख्यानसत्र, गांडूळ खत प्रकल्प त्याचबरोबर शोष खड्डे, वृक्षारोपण इत्यादी विषयावरती भर देण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार एनएसएस स्वयंसेविका कु. प्रेरणा उगले हिनी केले.