के. जे. सोमय्या वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

0

कोपरगाव : महाविद्यालयाच्या शा. शिक्षण विभाग, एन.सी.सी. व एन. एस. एस. विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक २१ जून २०२३ रोजी सकाळी ८.३० वा. महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी योगाचे जीवनातील महत्त्व व्यक्त केले. सदृढ जीवन जगण्यासाठी योग व प्रणायाम यांची नितांत गरज असल्याचे सांगितले.

तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बी. आर. सोनवणे यांनी उत्तम आरोग्यासाठी योगाचे महत्त्व सांगितले. महाविद्यालयातील भूगोल विभागाचे प्रा. डॉ. व्ही. एस. साळुंके यांनी योगातील विविध आसनांच्या प्रकारांचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना करून दाखविले. त्या समवेत महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. एस. बी. कुटे, कनिष्ठ महाविद्यालय शा. शिक्षक एम. व्ही. कांबळे, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ. ए. सी. नाईकवाडे, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी याप्रसंगी योगासने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here