कोंबडवाडी (कोल्हार) जिल्हा परिषद प्राथमिक  शाळेत माजी विद्यार्थी मेळावा

0

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी 

                 राहुरी तालुक्यातील कोंबडवाडी (कोल्हार) येथिल जिल्हा परिषद प्राथमिक  शाळेत माजी विद्यार्थी मेळावा २०२३ आयोजित करण्यात आला होता.आज पर्यंत अनेक माजी विद्यार्थ्यांचा मेळावा बघितले असतील.या मेळाव्यामध्ये आजोबा मुलगा आणि नातू या तीन पिढ्यांच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता.माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात तीन पिढ्या सहभागी झाल्या होत्या.

                 कोंबडवाडी (कोल्हार) येथिल शाळेची स्थापना 1965 साली झाली. या शाळेमध्ये आत्तापर्यंत 759 विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत. यापैकी काही विद्यार्थी इंजिनीयर,डॉक्टर, आणि मोठ्या  हूद्द्यावर काम करीत आहेत. तर काही विद्यार्थी हे उत्कृष्टपणे व्यवसाय करत आहेत. या मेळाव्यामध्ये अनेक माजी विद्यार्थींनी आपले मनोगत व्यक्त केले.आपल्या बालपणाची शाळा असुन या शाळेसाठी सर्व स्तरातून मदत मिळवून देण्याचे आश्वासन येदथिल शिक्षकांना दिले.तर काही विद्यार्थ्यांनी वैयक्तिक मदतही केली. यावेळी तीन पिढ्यातील आजोबा मुलगा आणि नातू हे सर्वजण या मेळाव्यात माजी विद्यार्थी म्हणून सहभागी झाले होते.बालपणाचे सवंगडी पुन्हा शाळेच्या मैदानावर आल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.सर्वच लहान-मोठ्या माजी विद्यार्थ्यांनी एकमेकांबरोबर फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. सर्व विद्यार्थी खूप वर्षानंतर एकञ आल्यामुळे शाळेत पुन्हा किलकिलाट झाला.प्रत्येकजण एकमेकांची आपुलकीने विचारपुस करीत होते. या मेळाव्याची विशेष बाब म्हणजे यामध्ये आजोबा मुलगा आणि नातू या तीनही पिढ्यांचे विद्यार्थी उपस्थित होते.हा मेळावा शनिवार 25 फेब्रुवारी रोजी पार पडला.

               माणसाने माणूसपण जपलं पाहिजे आणि ज्या मातीत वाढलो खेळलो ज्या शाळेत शिकलो त्या शाळेत पुन्हा येण्याची संधी मिळाली हेच आमचे भाग्य असे सर्वांचे म्हणणे होते. आपली शाळा संपूर्ण जिल्ह्यात आदर्श ठरावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आम्ही करू असे आश्वासन माजी विद्यार्थ्यांच्या वतीने देण्यात आले. तसेच भरघोस आर्थिक मदतही करण्यात आली. या शाळेत दोन शिक्षक असून एक पद रिक्त असतानाही एकच शिक्षकाने सदर मेळावा घडवून आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल त्या शिक्षकाचे कौतुक करण्यात आले. 

             यावेळी  राहुरी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी  गोरक्षनाथ नजन हे या मेळाव्यास उपस्थित होते. मिशन आपुलकी अंतर्गत लोकसहभाग जमा करून शाळेच्या प्रगतीस हातभार लावण्याचे आवाहन त्यांनी  केले. मनोज शिंगोटे, ज्ञानदेव शिरसाठ, हौशीनाथ सोनवणे,अनिल पाटील शिरसाठ, नारायण शिरसाठ,डाँ. प्रदीप शिरसाठ,गौतम पाटील शिरसाठ, भास्कर रामभाऊ चिखले, द्वारकानाथ पाटील शिरसाठ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबासाहेब भाऊसाहेब शिरसाठ, नवनाथ शिरसाठ, अरुण शिरसाठ, विवेक शिरसाठ, निलेश चिखले, रामेश्वर क्षीरसागर , तुळशीराम शिरसाठ, शिक्षण विस्तार अधिकारी अर्जुन गारुडकर आदी उपस्थित होते. 

            कार्यक्रमाचे कोंबडवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक  संतोष वैष्णव यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here