कोपरगांव- भारतीय जनता पार्टी चे सर्वेसर्वा स्व.श्रधेय अटलबिहारी वाजपेयी यांची १०० वी जयंती टेकचंद खुबाणी परिवार व भारतीय जनता पार्टी वसंतस्मृति च्या वतीने साजरी करण्यात आली. कोपरगांव शहरातील साई कॉर्नर येथील साईंबाबा तपोभुमी परिसरात सदरिल जयंती साजरी करण्यात आली. भारतीय जनता पार्टी चे जेष्ठ नेते व ज्यांनी अटलजी यांच्या सोबत काम केलेले आहे असे टेकचंद खुबाणी यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले.
यावेळी विजयराव वहाड़णे,विनायक गायकवाड़, तुलसीदास खुबाणी,चेतन खुबाणी, सुभाष दवंगे, पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष काका कोयटे, गोदावरी दुध संघाचे राजेश आबा परजणे,डॉ. सुभाष मुंदड़ा युवक संघटनेचे संस्थापक दतोबा जगताप,वकिल संघाचे अध्यक्षएड.अशोक राव वहाड़ने, जेष्ठ नेतेपदमाकांत कूदले, नामदेव जाधव,छन्नूदास वैष्णव, विनीत वाडेकर, मन्नु कृष्णणी,किरण कानडे,किरण थोरात,सुरेश कांगूने,नंदु जोशी,अनिल वायखिंडे,श्रीकांत बागुल,कैलास खुबाणी,बंटी खुबाणीआदि उपस्थित होते
यावेळी भारतीय जनता पार्टी कोपरगाव व शिर्डी चे अनेक जुने नवीन सहकारी,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक स्वयंसेवक सहित कोपरगाव शहरातील अनेक राजकीय व सामाजिक कार्यकर्ते,तसेच अनेक पत्रकार उपस्थित होते. यावेळी टेकचंद खुबाणी,विजयराव वहाड़ने,सुभाष दवंगे, यानी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमानंतर प्रसाद वाटप झाले . पौराहित्य वैभव जोशी यानी केले तर स्वागत विनायक गायकवाड़ यानी केले तर चेतन खुबाणी यानी आभार मानले.