कोपरगांव (प्रतिनिधी)
आज मंगळवार दि.२४ रोजी पाथरवट समाज सेवा मंडळ, बेट-कोपरगांवचे सहकार्याने, पाथरवट समाज महिला आघाडी, कोपरगांव यांचे वतीने समाजातील मुलींसाठी राष्ट्रीय बालिका दिन व समाजातील महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित केला होता. या प्रसंगी मुलींचे व महिलांचे विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. अध्यक्ष संजय धानके यांनी बालिका दीन साजरा करण्यामागील उद्देश सांगून बालिका दिनाची माहिती दिली. मुलींना महिला अध्यक्षा राजश्री टोरपे यांचे हस्ते भेटवस्तू दिल्या. तसेच महिलांनी एकत्र येऊन संक्रांत वाण लुटले व मनोरंजनाचा आनंद घेतला. डान्स, संगीतखुर्ची, उखाणे असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. समाजातील महिलांची व मुलींची उत्स्फूर्त उपस्थिती होती. पाथरवट समाजातर्फे प्रथमच राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमात शामल धानके हिने सूत्रसंचालन केले प्रेरणा महेंद्र टोरपे हिने आपले मनोगत व्यक्त करून समाजातर्फे महिलांसाठी सन्मानपूर्वक विविध कार्यक्रम घेऊन समाजातील महिलांना संघटित करण्याचा चांगला प्रयत्न होत आहे, असे गौरवोद्गार काढून कार्यक्रमाबद्दल आभार व्यक्त केले. अध्यक्षा सौ. राजश्री अनिल टोरपे तसेच सौ. श्रद्धा धानके, सौ. सविता टोरपे, सौ. रेखा टोरपे, सौ. पल्लवी भगत, सौ. प्राजक्ता कुडके, सौ. रंजना अनिल भोईर, सौ. कविता डोंगरे, सौ. निर्मला भगत सौ. ज्योती गगे आदी सर्व कार्यकारिणी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच पाथरवट समाज अध्यक्ष संजय धानके सह उपाध्यक्ष कल्पेश टोरपे, सचिव महेंद्र टोरपे, प्रताप केने, परशुराम टोरपे, अनिल भोईर, रवींद्र भगत, अनिल टोरपे, हेमंत भोईर, महेश डोंगरे, अभय गगे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.