कोपरगांव बेट भागात वृक्षारोपण संपन्न…

0

कोपरगांव : कोपरगांव न.पा.शिक्षण मंडळ शाळा क्रमांक ५ वतीने कोपरगांव बेट भागात वन महोत्सव निमित्ताने वृक्षारोपण संपन्न झाले आहे. “वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे ” या उक्तीप्रमाणे निसर्गाचा समतोल राखण्याकरिता वृक्षलागवड व संवर्धन अत्यंत आवश्यक आहे. कोपरगांव बेट भागात नगरपालिका शाळा नं. ५, कोपरगावच्या परिसरात नगरपालिका व सामाजिक वनीकरण कोपरगावच्या सहभागातून वृक्षारोपनाचा कार्यक्रम मुख्याधिकारी सुहास जगताप यांचे अध्यक्षतेखाली आणि वनपरीक्षेत्र अधिकारी निलेश रोडे,महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार सन्मानित सुशांत घोडके परिसरातील नागरिक यांचे शुभहस्ते संपन्न झाला.

या प्रसंगी मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी शाळेच्या वृक्ष लागवड व संवर्धनाचे कौतुक केले. जागतिक तापमान वाढीबाबत चिंता व्यक्त करून झाडांची घरोघरी व सार्वजनिक ठिकाणी लागवड करून संवर्धन करण्याचे आवाहन केले.तर वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश रोडे यांनी अकारण वृक्षावर कुऱ्हाड चालवू नये.असे आज्ञापत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी काढले होते.याबाबत आठवण करून दिली.महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार विजेते सुशांत घोडके यांनी आपल्या मनोगतात वृक्षाचे महत्व, काळाची गरज याबाबत मत व्यक्त केले.                                     पर्यावरणाचा ऱ्हास थांबवणे आवश्यकता व्यक्त केली. आयुर्वेदिक वनस्पतीबाबत त्यांनी महत्व विषद केले.

कार्यक्रमास दैत्यगुरु शुक्राचार्य  देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, पूनम गगे ,वन परिमंडळ अधिकारी सुनीता यादव, वनरक्षक मुस्ताक सय्यद व निर्मला शिंदे, लिलावती जमधडे, विनोद नाईकवाडे, बाबासाहेब आव्हाड, रामभाऊ कदम, वैभव जमधडे, विशाल आव्हाड,वर्षा वाघमारे, भाऊसाहेब शिंदे, अर्चना वाघमारे, अशोक मतकर, प्रकाश साळुंके, सुनिल साळुंके, गट समन्वयक, प्रशांत शिंदे ,अमित पराई,ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सर्व मान्यवरांचे शुभ हस्ते लिंब, चिंच, आंबा, वड, करंज, भेंडी, इत्यादी ५०  वृक्षांची लागवड करण्यात आली. या कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी श्रीराम थोरात, मनोजकुमार पापडीवाल -उप मुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे नगरपालिका अधिकारी यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचलन शिक्षक सुनिल रहाणे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वी करण्याकरिता शाळेचे मुख्याध्यापक विलास माळी, सुनील रहाणे,अमोल कडू व नसरीन पठाण यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here