कोपरगाव जिल्हा होण्यासाठी जनरेटा लावणे गरजेचे : विजय वहाडणे

0

कोपरगाव : कोपरगाव जिल्हा व्हावा असे वाटत असेल तर सुरुवातीला नागरिकांनी,राजकिय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी, समाजसेवकांनी,नेत्यांनी राज्य शासनाकडे याबत निवेदने- पत्रव्यवहार करून मोठ्या प्रमाणावर जनरेटा लावणे गरजेचे आहे. आजच कोपरगाव बंद करणे योग्य होणार नाही असे मला प्रामाणिकपणे वाटते. असे मत माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी व्यक्त केले .
आपल्या पत्रकात वहाडणे यांनी पुढे म्हटले आहे की आधीच बाजारपेठ ठप्प आहे असे आपण म्हणतो,पाऊस नसल्याने सर्वचजण संकटात आहेत.अशा काळात कोपरगाव बंद पुकारल्यास छोटे मोठे व्यावसायिक,दुकानदार,हातावर पोट भरणारे लोक यांच्यावर अन्याय केल्यासारखे होईल.
म्हणून ज्यांना ज्यांना कोपरगाव जिल्हा व्हावा असे वाटते त्यांनी सुरुवात म्हणून तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन,लाक्षणिक उपोषण-बेमुदत उपोषण अशा मार्गाने जाणेच उचित होईल.
वातावरण निर्मिती झाल्यानंतर बंदचाही विचार करता येईल. पण इतर ठिकाणी बंदचे आंदोलन झाले म्हणून कोपरगावही बंद ठेवणे योग्य होणार नाही.तरीही कुणी कोपरगाव बंद केलेच तर सामान्यांचा नाईलाजच आहे.
अ.नगर जिल्ह्याचे विभाजन करून नविन जिल्ह्याचे मुख्यालय आपल्याकडेच व्हावे यासाठी श्रीरामपूर,संगमनेर इ.ठिकाणहून मागण्या-बंद-आंदोलने-मोर्चे निवेदने-बातम्यांचा ओघ सुरू झालेला आहे.यापूर्वीही अधूनमधून जिल्हा विभाजनाच्या वावड्या उठल्याचे जनतेने अनुभवलेले आहे.
विविध राजकिय पक्षांचे नेते अनुयायांना पुढे करून अशी मागणी करून काय परिणाम होतात याचा अंदाज घेत असतात.यापूर्वी अनेकदा काही कार्यकर्त्यांनी-समाजसेवकांनी कोपरगावला नवीन जिल्ह्याचे मुख्यालय व्हावे यासाठी शासनाकडे मागण्या करून तशा बातम्याही वृत्तपत्रात येऊन गेलेल्या आहेत.हा विषय केवळ बातम्यांपुरता मर्यादित रहात आलेला आहे.मात्र बहुतांश बडे नेते नेहमीच मूग गिळून असतात.
कोपरगावातील दिवंगत जेष्ठ कार्यकर्ते स्व.बजरंगजी लचुरे,धडपडे समाजसेवक श्री.किशोर चोरगे,रविंद्र जगताप
इ.नी या विषयाबाबत शासनाकडे पत्रव्यवहार करून मागणी केलेली आहे.काही काळ चर्चा होऊन हा विषय शांत होऊन जातो.आताही पुन्हा नवीन जिल्हा
मुख्यालयाचा विषय चर्चेत आलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here