कोपरगाव... कोपरगाव तालुक्यात गेल्या महिन्यापासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची पिके संपूर्ण बाधित झाली असून जनावरांच्या चाऱ्याचा ही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दुष्काळ जाहीर करायला औपचारिकताच बाकी राहिली असून निदान तालुक्यात पाणीटंचाई व्हायला नको म्हणून काल जेऊर कुंभारी परिसरातील महिलांनी एकत्र येत गोदावरी नदीच्या गंगाजलाने नदीकाठच्या गंगेश्वर महादेव , संजय नगरच्या गणपती बाप्पा तसेच मेहेत्रे वस्तीवरील मारुतीला स्नान घालत अभिषेक केला.
वर आभाळाकडे आर्त हाक देत वरून राजाला संपूर्ण महाराष्ट्रात बरसण्याची विनंती केली.कोपरगाव तालुक्यातील कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जाणारा हा परिसर आज संपूर्ण दुष्काळग्रस्त झाला असून शेतकऱ्यांच्या शेती पिके सोयाबीन, मका ऊस भाजीपाला फळबागा आदींचे पावसाने ओढ दिल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतातील संपूर्ण सोयाबीन जमीनदोस्त झाली असून सरकार व प्रशासनाकडून अद्यापही नुकसानीचे पंचनामे झालेले दिसत नाही.शेतकऱ्यांच्या जनावरांना चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पूर्वी पावसाला साकडे घालण्यासाठी यज्ञ तसेच विविध धार्मिक कार्यक्रम केले जायचे. आजही माता-भगिनींची श्रद्धा आज जागृत झाली आहे.परमेश्वरा पाऊस पडू दे, शेतकऱ्यांचे कल्याण होऊ दे, प्राणिमात्रांना चारा पाणी मिळू दे अशी हाक देत महिलांनी टाळ आणि पखवाज घेत संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय करून टाकला.महिलांनी केलेल्या या उपक्रमात सरपंच महासंघाचे तालुकाध्यक्ष जालिंदर चव्हाण, प्रकाश वक्ते,सुचिता शिंदे,मनीषा शिंदे,आशा शिंदे,रूपाली शिंदे,विमल देवकर,लहानबाई काटे,भारती शिंदे,सरसाई गोसावी,मंडाबाई वक्ते,मुक्ताबाई वक्ते,गयाबाई वक्ते,सुमनताई देवकर,वनिता सोळके,कांताबाई सोळंके,मनीषा सोळंके, कल्पना सोळंके अदी उपस्थित होत्या.कार्यक्रमाची सांगता मारुती मंदिर परिसरात करण्यात आली सर्वांचे आभार जालिंदर चव्हाण यांनी मानले.