कोपरगाव शहराच्या २.६० कोटीच्या विविध विकास कामांना प्रशासकीय मान्यता-आ.आशुतोष काळे

0

कोळपेवाडी वार्ताहर :- साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना २०२३-२४ अंतर्गत कोपरगाव शहरातील विविध विकास कामांच्या २.६० कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मिळवत केलेल्या विकास कामांमुळे कोपरगाव शहराचा कायापालट झाला असून शहराच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी मिळावा यासाठी आ.आशुतोष काळे यांचा शासनस्तरावर पाठपुरावा सुरु आहे. त्या पाठपुराव्यातून साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना २०२३-२४ अंतर्गत कोपरगाव शहरासाठी २ कोटी ६० कोटीच्या विविध विकास कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ज्यामुळे शहरातील जीवनमानात सुधारणा होईल आणि नागरिकांना अधिकाधिक सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहेत.

यामध्ये कोपरगाव नगर परिषद हदीतील प्रभाग क्र.०१ मध्ये लक्ष्मण सपकाळ ते अजय गुप्ता घर रस्ता कॉक्रीटीकरण व भुमिगत गटार करणे, शंकर कुमावत घर ते गजानन कदम घर रस्ता कॉक्रीटीकरण व भुमिगत गटार करणे, कृष्णा आवारे घर ते गुंजाळ घर रस्ता कॉक्रीटीकरण करणे, गिरमे घर ते कोपरे घर रस्ता कॉक्रीटीकरण करणे, चव्हाण घर ते तांबट घर भुमिगत गटार करणे, सादिक शेख घर ते देवकर घर भुमिगत गटार करणे, नगर-मनमाड महामार्ग ते इंगळे चर ते आयटीआय कॉलेज चर भुमिगत गटार करणे, सुनिता पवार घर ते अमजद सय्यद घर भुमिगत गटार करणे, अमोल पवार घर ते साक्षी किराणा परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे, प्रभाग क्र.७ मध्ये बिस्मिल्ला हॉटेल ते खंदक नाल्यापर्यंत भुमिगत गटार करणे, असलम शेख वखार ते जब्बार कुरेशी घरापर्यंत भुमिगत गटार करणे, मेहत्तर घर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे, पाठक घर ते कासलीवाल कंपाऊंडपर्यंत पेव्हर ब्लॉक बसविणे, प्रभाग क्र.८ मध्ये एस.पी.औताडे घर ते बत्रा घरापर्यंत भुमिगत गटार करणे, रसिक कोठारी घर ते गोरक्षनाथ घरापर्यंत साईड पेव्हर ब्लॉक बसविणे, जितेंद्र रणशूर घर ते अॅड.विद्यासागर शिंदे घरापर्यंत पेव्हर ब्लॉक बसविणे, प्रभाग क्र.१० मध्ये दिलीप घोडके घर ते निकम घरापर्यंत पेव्हर ब्लॉक बसविणे, बालाजी अंगण घर ते किरण मवाळ घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे, डॉ.आचारी हॉस्पिटल ते रोहित वाघ घरापर्यंत रस्ता साईडपट्टीस पेव्हर ब्लॉक बसविणे आदी कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील कामांचा समावेश आहे. 

कोपरगाव शहराच्या विकासकामांना निधी मंजूर केल्याबद्दल आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे, पालकमंत्री ना.राधाकृष्णजी विखे पाटील यांचे आभार मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here