कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव शहरातील विविध विकासकामांसाठी सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हा स्तर), साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधारणा योजना, नागरी दलितेतर वस्ती सुधारणा योजनेंतर्गत कोपरगाव शहरातील विविध विकास कामांसाठी ११ कोटी ९५ लाख ३६ हजार रुपये निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
प्रभाग क्रमांक १ मध्ये चव्हाण घर ते १२ मिडीपी रस्ता खडीकरण करणे, रेणुका निवास ते १२ मिडीपी रस्ता खडीकरण करणे, आहिरे घर ते १२ मिडीपी रस्ता खडीकरण करणे, चव्हाण घर ते खडकी रस्ता खडीकरण करणे १४.८५ लक्ष, समतानगर मधील चव्हाण घर ते १२ मिडीपी, रेणुका निवास ते १२ मिडीपी, आहिरे घर ते १२ मिडीपी, चव्हाण घर ते खडकी, लोखंडे घर ते साई सिटी या ठिकाणी भुयारी गटार बांधकाम करणे ४३.८८ लक्ष.

महाजन गोठा-गायकवाड-जगताप-कुदळे घर रस्ता काँक्रिटीकरण करणे १४.१३ लक्ष,गायकवाड घर ते पाटोळे घर रस्ता डांबरीकरण करणे १२ लक्ष, भागानगर अंतर्गत रचना पार्कलगत नगर मनमाड हायवेला जोडणाऱ्या दोन रस्त्यांचे मजबुतीकरण करणे २७.८० लक्ष, सुखशांती नगर मध्ये चारीवर पुलाचे बांधकाम करणे ४०.३२ लक्ष.
प्रभाग क्रमांक ०२ मध्ये गोदावरी पेट्रोल पंप ते समता स्कूल रस्ता डांबरीकरण करणे ०१ कोटी, कलविंदर डडीयाल घर ते झावरे घरा पर्यंत साईड पट्टी व पेविंग ब्लॉक बसविणे ४.९४ लक्ष, रुईकर घर ते गजानन अपार्टमेंट पर्यंत साईड पट्टी व पेविंग ब्लॉक बसविणे ४.९८ लक्ष, जुना टाकळी नाका ते खडकी रस्ता डांबरीकरण करणे ४० लक्ष,
प्रभाग क्रमांक ०३ मध्ये वैशाली स्कूटर ते अमरधाम रस्ता डांबरीकरण करणे २५ लक्ष, महाजन घर ते आर के इंजिनिअरींग रस्ता काँक्रीटीकरण करणे १० लक्ष, हिराबाई लाड घर ते शिंदे घर रस्ता काँक्रीटीकरण करणे १०.१४ लक्ष,
प्रभाग क्रमांक ०४ मध्ये वडांगळे वस्ती ते शेखर रहाणे वस्ती रस्ता डांबरीकरण करणे १२.०९ लक्ष, जाकीर भाई ते घर ते अमोल शर्मा घर रस्ता डांबरीकरण करणे १२.०४ लक्ष.
प्रभाग क्रमांक ०६ मधील श्री शनी मंदिर ते धारणगाव रस्ता (टिळकनगर) डांबरीकरण करणे ३०.६३ लक्ष, उर्दू शाळा येथे महिला-पुरुष शौचालय बांधणे १० लक्ष, श्री छत्रपती शिवाजी स्मारक ते तहसील कार्यालय रस्ता (बँक रोड) डांबरीकरण करणे ३०.११ लक्ष,ढमाले घर ते आरशी कॉम्लेक्स रस्ता काँक्रीटीकरण करणे २०.३१ लक्ष, मुंदडा घर ते लोकशाहीर आण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृह रस्ता डांबरीकरण करणे २० लक्ष, देवरे घर ते भुसारी घरापर्यंत संघवी घर ते माळी बोर्डिंग पर्यंत टिळकनगर शॉपिंग कॉम्प्लेक्स शेजारील परिसर, जिओ ऑफिस ते संदिप किराणा पर्यंत पेविंग ब्लॉक बसविणे २३.१३ लक्ष.
प्रभाग क्रमांक ०७ मधील धारणगाव रोड ते कृषी उत्पन्न बाजार समिती बैल बाजार रोडचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ९९.९१ लक्ष, खंदकनाला पुल ते टोमॅटो मार्केट रस्ता खडीकरण व काँक्रीटीकरण करणे ९.६२ लक्ष, खंदकनाला कासलीवाल संरक्षक भिंती समोरील पुलाचे बांधकाम करणे ५०.५५ लक्ष
प्रभाग क्रमांक ०८ मधील बाळासाहेब संधान घर ते पठाण घर रस्ता कॉंक्रीटीकरण करणे २५.२३ लक्ष, कडोसे घर ते संदीप पगारे घर रस्ता कॉंक्रीटीकरण करणे प्रभाग २०.२० लक्ष.
प्रभाग क्रमांक ०९ मध्ये धारणगाव रोड श्रद्धा टॉवर्स ते सेवा निकेतन पर्यंत रस्ता डांबरीकरन करणे ३०.११ लक्ष, लक्ष्मी नगर भागातील विविध गल्ल्यांमध्ये पेविंग ब्लॉक बसविणे ३० लक्ष, इंदिरा पथ रोडवरील झावरे हॉस्पिटल ते नरोडे घर रस्ता डांबरीकरण करणे २४.११ लक्ष, रसराज मेडिकेअर ते श्रद्धा नगरी रस्त्याला पेविंग ब्लॉक बसविणे २५ लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे.
प्रभाग क्रमांक १० मध्ये श्रीराम मंदिर ते सेवा निकेतन स्कूल समोरून जाणारा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, १८.४६ लक्ष, मन्सुरी घर ते श्री हनुमान मंदिरापर्यंत भुयारी गटार बांधकाम करणे १९.८९ लक्ष, नितीन पवार घर ते मन्सुरी घरापर्यंत भुयारी गटार बांधकाम करणे १०.११ लक्ष, भास्कर घर ते शेख घरापर्यंत भुयारी गटार बांधकाम करणे १०.०९ लक्ष, माउली मंगल कार्यालय ते भास्कर घरापर्यंत रस्ता कॉंक्रीटिकरण करणे १२.७८ लक्ष, वालझाडे किराणा स्टोअर्स ते नवीन कब्रस्थान पर्यंत रस्ता कॉंक्रीटिकरण करणे १७.०४ लक्ष,
प्रभाग क्रमांक ११ मधील अंबिका मेडिकल ते श्री दत्त मंदिर रस्ता कॉंक्रीटिकरण करणे ३०.१६ लक्ष, तसेच कोपरगाव नगरपरिषदेच्या वाढीव हद्दीत देवकर प्लॉट रस्त्यासाठी १० लाख निधी मंजूर, तसेच गवारे वस्ती व साबळे वस्तीसाठी १० लाख निधी मंजूर करण्यात आला आहे.
प्रभाग क्रमांक १२ मधील बबलू कुदळे घर ते जुबेदा आपा घर दीपक घाटे घर फौजिया घर ते मिटकर घरापर्यंत तायरा आप्पा घर ते मोहम्मद शेख घरापर्यंत रस्ता कॉंक्रीटकर्ण करणे १५.२५ लक्ष, प्रभाग १३ मधील किशोर थोरात घर ते श्री गोरोबा मंदिर पर्यंत रस्ता खडीकरण करणे ९.९७ लक्ष, लव्हाटे महाराज घर ते श्री गोरोबा मंदिर पर्यंत रस्ता खडीकरण करणे ९.९२ लक्ष,प्रभाग क्रमांक १४ मधील गोदावरी नदीवरील छोटा पूल ते मोहनीराज नगरकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे ३७.२६ लक्ष,पयले घर ते पंडोरे वस्तीपर्यंत रस्ता खडीकरण करणे ३१.३४ लक्ष, नगर मनमाड महामार्ग ते श्री शुक्राचार्य मंदिरापर्यंत कॉन्क्रिट रस्ता सुधारणा करणे व भुयारी गटार बांधकाम करणे ९.९६ लक्ष निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे. आ. आशुतोष काळे यांनी मागील साडे तीन वर्षात कोपरगाव शहराचा अनेक वर्षापासुनचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्या बरोबरच शहरातील रस्त्यांना व सुशोभिकरणाला देखील कोट्यावधी रुपयांचा निधी दिल्यामुळे रुळावर घसरलेली कोपरगाव शहराच्या विकासाची गाडी पुन्हा रुळावर आली असून आ. आशुतोष काळेंच्या प्रयत्नातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असल्यामुळे विकासाची गाडी सुसाट सुटली आहे. त्यामुळे नागरिकांनी होत असलेल्या विकासाबद्दल आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.