कोपरगाव शहरात पुन्हा एकदा राडा …

0

गुन्हेगारी टोळ्यांच्या आपसातील स्पर्धेने शहरातील कायदा सुव्यवस्थेचे वाजले तीनतेरा …

कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव शहरातील गुन्हेगारी टोळ्यांच्या आपसातील हाणामाऱ्या वाढल्या असून कधी भर दिवसा तर कधी रात्री अपरात्री हे टोळके आपसात भिडू लागल्याने नेहमीच विविध ठिकाणी टोळी युद्ध बघायला मिळत आहे. यामुळे कोपरगाव शहर आणि तालुक्याची कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे . नुकतेच कोपरगाव शहरातील आयटीआय कॉलेज जवळ काही किरकोळ कारणाने एका गटाने एका राजकीय पदाधिकाऱ्या सह बांधकाम व्यावसायिकांस मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच दोन ते तीन दिवसानंतर कोपरगाव शह शहरातील मोहनीराज नगर भागामध्ये पुन्हा एकदा दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे. यामध्ये दोन्ही गटातील अनेकजन गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की कोपरगाव शहरातील मोहनीराज नगर भागात काल दिनांक(27 मार्च रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास काही किरकोळ वादातून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. या घटनेत 2 जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या हाणामारीमध्ये लाकडी दांडके, काही लोखंडी बनावटीचे हत्यार सर्रास वापरण्यात आल्याचे दिसून आले आहेत. घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. सदर घटनेने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेत दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यातील एका गटाकडून अतुल देविदास आव्हाड (वय 19, रा. गजानन नगर) यांनी फिर्याद दाखल केली असून, त्यांच्या तक्रारीनुसार  आरोपी नामे 1.कालू आप्पा 2.सोन्या आव्हाड 3.सागर पंडोरे 4. शुभम आढाव 5. नितीन हमरे 6.अविनाश गीते 7. अंकुश 8. सोनू बोडखे तसेच इतर तीन ते चार अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरा गटाकडून अनिल विनायक आव्हाड (वय 38, रा. मोहनीराज नगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी नामे अतुल आव्हाड आणि त्याचे दोन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर प्रकरणाचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करत आहेत. हाणामारीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांनी दोन्ही गटांच्या जबाबांच्या आधारे पुढील तपास सुरू केला आहे.

या घटनेनंतर मोहनीराज नगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करत असून, लवकरच या हाणामारीमागील कारण उघड होईल, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

 कोपरगाव शहरामध्ये याप्रकारे हाणामारीचे प्रकार वाढत असून पोलीस प्रशासनाचा कोणताही धाक या गुन्हेगारांवर राहिला नसल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे . हाणामारी होतात व किरकोळ स्वरूपाचे गुन्हे दाखल होऊन पुढील गुन्ह्यात तेच आरोपी सक्रिय होतांना दिसतं आहेत, त्यामुळे या प्रकराच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने कोणतीही कडक कारवाई होताना दिसत नाही.

पोलीस कारवाईच्या आड येते कधी राजकीय संबंध तर कधी आर्थिक हितसंबंध ?

या हाणामाऱ्या करण्यामध्ये बऱ्याचदा स्थानिक गुंडांचा अवैध व्यवसायातील स्पर्धा असल्याचे कारण दिसून येते . तर कधी सर्व सामन्य नागरिकांमध्ये केवळ दहशत निर्माण करण्यासाठी हे गुन्हेगार धिंगाणा घालताना दिसून येतात . या गुन्हेगारांची शहरातून मोठ्या स्वरूपात दहशत निर्माण होऊ पाहत आहे. असे असताना पोलीस प्रशासन या गुन्हेगारांवर फार काही कडक स्वरुपाची कारवाई करताना दिसून येत नाही. कारण त्यांच्या कारवाईच्या आड गुन्हेगारांचे असलेले राजकीय संबंध आडवे येतात तर कधी आर्थिक हितसंबंध आडवे येत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये ऐकायला मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here