कोपरगाव शहराला आता मिळणार ३ दिवसाआड पाणी

0

कोपरगाव : नुकताच कोपरगाव शहरातील पाणी प्रश्न सोडवीत आम.आशुतोष काळे यांनी ५ व्या साठवण तलाव पूर्णत्वाकडे नेऊन ऐतिहासिक काम करून त्याचे जलपूजन मोठ्या धुमधडाक्यात केले, त्या जल पूजनाच्या २ दिवसानंतरच नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन नागरिकांना प्रत्यक्षात पाणी कधी मिळणार यावर चर्चा करत जो पर्यंत नवीन पाणी पुरवठा योजना पूर्णपणे कार्यान्वित होईपर्यंत सध्याच्या ८ दिवसाआड पाणी पुरवठ्यात बदल करून कालावधी कमी करण्याच्या सूचना केल्या .

या सुचानेप्रमाणे कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी रविवारी २२ सप्टेंबर पासून कोपरगाव शहराला ३ दिवसा आड पाणी पुरवठा करणार असल्याचे सांगितले . सर्व नागरिकांनी जुन्या पाईपलाईन वरून नवीन योजनेच्या पाईपलाईन वर नळ जोडणी करून घेण्याचे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले आहेत. त्याचप्रमाणे नवीन जोडलेल्या नळाला तोटी बसवून घेण्याची सूचना देखील मुख्याधिकारी यांनी केली आहे. सुरुवातीला तोट्या बसून घेण्यासाठी तसेच पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नगरपालिकेकडून नागरिकांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. त्यानंतर मात्र जे नागरिक आपल्या नळांना तोटी बसवणार नाही त्यांच्यावर कारवाई करणार येणार असल्याचेही मुख्याधिकारी जगताप यांनी सांगितले 

  यावेळी आमदार काळे म्हणाले की ५ व साठवण तलाव पूर्ण करून या पाण्याचे ही वितरण रविवार पासून होत आहे,,यानंतर १ते ४ या जुन्या साठवण तलावाचेही नूतनीकरण लवकरच होणार असून त्याद्वारे शहराला ९६० एम एल डी पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. त्यानंतर मात्र शहराला दररोज पाणीपुरवठा होणार असल्याची ग्वाही यावेळी आमदार काळे यांनी दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here