कोपरगाव प्रतिनिधी : विवेक कोल्हे हे आमचे हिरो आहे. त्यांच्याकडे पाहून मला माझे तरुणपण आठवत आहे. भैय्याच्या रूपाने मतदार संघांसाठी नवे तरुण नेतृत्व मिळाले आहे. हा त्यांचा उमेदीचा काळ आहे .असे असतानाही त्यांनी पक्षासाठी थांबण्याचा घेतलेला कौतुकास्पद आहे. आणि त्यांच्या या निर्णयानंतर ही कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहे. हे त्यांचे मोठे यश आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये पक्ष श्रेष्ठीनी कोल्हे परिवाराला दिलेला शब्द पूर्ण करणारच असे आश्वासन भाजपचे संकटमोचन अशी ओळख असलेले मंत्री गिरीश महाजन यांनी दिले . कोल्हे परिवाराने आपल्या निवासस्थानी आयोजित केलेल्या दिवाळी फराळ कार्यक्रम आणि भाजप कार्यकर्ता मेळाव्यामध्ये ते बोलत होते.
यावेळी भाजपचे पक्ष निरीक्षक राजेंद्र तिवारी, शिरीष भट,शब्दशरण ब्रह्मभट , विवेक कोल्हे, बिपीन दादा कोल्हे,माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या सह महाजन कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते. महाजन पुढे म्हणाले पैशापेक्षा सामाजिक काम राजकारणात अधिक महत्वाचे. सध्या राज्यामध्ये प्रचंड राजकीय अस्थिरता आहे. आज कोण कोणत्या पक्षात आहे हे सांगणे अवघड आहे. भैय्या पक्ष सोडून जाता की काय याची भीती आम्हास होती. मात्र त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला विवेक कोल्हे थांबले त्याच फळ त्यांना नक्कीच मिळेल. कोल्हे परिवाराने दूरदृष्टीने घेतलेला निर्णय योग्य ठरणार आहे. त्याचं भाजपमध्ये भविष्य उज्वल असणार आहे. भाजप हा कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष आहे. कोल्हेना दिलेला शब्दपक्ष नक्कीच पूर्ण करेल .
यावेळी स्नेहलता कोल्हे म्हणाल्या की समोरचे आमच्याशी कसेही वागले तरी आम्ही भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आहोत . त्यामुळे आम्ही पक्षाने दिलेला आदेश मानून युती धर्म पाळाणार आहोत.तर बिपीन दादा कोल्हे आपल्या मिश्किल भाषणादरम्यान म्हणाले आम्ही भाजपच्या विचाराशी बांधलेलो आहोत. त्यामुळे कार्यकर्त्यांची भावना जरी वेगळी असली तरी आम्ही महायुतीच्या उमेदवाराचे काम करणार आहोत . आमचे जे ओठात आहे तेच पोटात आहे. परंतु पक्षानेही आम्हाला दिलेला शब्द पाळावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
राजकारणात संयम असल्यास फळ मिळणारच
चौकट : राजकारणात संयम आणि पक्षावर निष्ठा राखल्यामुळे माझ्यासारखा एका सर्व सामान्य शिक्षकाचा मुलगा असलेला गिरीश महाजन हत्तीवरून साखर वाटणाऱ्या मोठ्या राजकीय प्रस्थाला हरवून आमदार होऊ शकला आहे. त्यामुळे विवेक कोल्हेनीही पक्ष आदेश पाळून आज जरी दोन पावले माघार घेतली असली तरी भविष्यातील मोठी झेप घेण्याची त्यांची ती तयारी आहे.
महायुतीचा उमेदवार असूनही गाठ भेट नाही
कोपरगाव विधानसभा मतदार संघामध्ये विद्यमान आमदार आशुतोष काळे हे महायुतीचे उमेदवार आहे. मात्र त्यांच्या मंचावर अद्यापतरी भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाचे कोणतेही पदाधिकारी किंवा कार्यकर्ते दिसून आलेले नाही. त्यामुळे कोपरगाव महायुती मध्ये अद्यापतरी समन्वय दिसून आलेला नाही. भाजप आणि महायुतीचे संकटमोचन म्हणून ओळख असलेले मंत्री गिरीश महाजन यावर काही तरी उपाययोजना करतील अशी अपेक्षा होती . मात्र कोपरगाव मध्ये येऊनही त्यांनी उमेदवाराची भेट न घेतल्याने कार्यकर्ते आणि जनतेमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.