कोल्हे विधानसभेची उमेदवारी करणार नसल्याच्या चर्चांना उधान !

0

कोपरगाव : संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेचे रणधुमाळी सुरू झाली असून अनेकांनी आपल्या गुडघ्याला बाशिंग बांधल्याचे दिसून येत आहे. पक्षातील बंडखोरी अथवा थेट पक्षांतर या गोष्टींना देखील वेग आला असून अनेक मतदारसंघांमध्ये उलथा पालथ होताना दिसत आहे. कोपरगाव विधानसभा मतदार संघामध्येही या निवडणुकांची तयारी जोरात सुरु आहे. यावेळीही काळे विरुद्ध कोल्हे या पारंपारिक विरोधकांमध्ये हा सामना होणारा असल्याचा अंदाज व्यक्त होत असतानाच आज कोल्हे पक्षाचा आदेश मानत उमेदवारी करणार नसल्याच्या चर्चा अचानक कोपरगावमध्ये सुरु झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे .

काल १७ रोजी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली तसेच एक तासापेक्षा जास्त वेळ याविषयी अनेक खलबत झाली मात्र यादरम्यान कुठलेही ठोस असे आश्वासन पक्षाकडून मिळाले नसल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला कोल्हे उभे राहणार नसल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये अशी चर्चा सुरु असूनही युवा नेते विवेक कोल्हे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्याकडून अद्यापही कुठलीच प्रतिक्रिया न आल्याने कार्याकार्त्यासमोरही नक्की काय करायचे हा प्रश्न उभा ठाकला आहे.

कोपरगाव मध्ये काळे आणि कोल्हे हेच पक्ष

राज्यात कोणता पक्ष सत्तेत असला तरी कोपरगाव मध्ये काळे आणि कोल्हे गट म्हणजेच पक्ष असे राजकीय गणित असते. त्यामुळे पक्षाने तिकीट नाकारले तरी स्वबळावर ते निवडणुका लढल्याचे आतापर्यंत तरी दिसून आले आहेत. पक्ष सध्या तरी काळे आणि कोल्हे महायुतीचे घटक आहेत . परंतु कोपरगावची जागा ही विद्यमान आमदार आशुतोष काळे यांच्याकडे असल्याने कोल्हे यांची खऱ्या अर्थाने मोठी अडचण निर्माण झाली आहे तसेच कोल्हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला पक्षाचा आदेश मानणार का ? कोपरगाव विधानसभा मतदार संघामध्ये आतापर्यंत अनेक लढती झाल्या असतील मात्र कोल्हे विरुद्ध काळे हीच लढत लक्षवेधी ठरली आहे. राज्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी अशी सरळ लढत होण्याचे चिन्ह जरी असले तरी मागील दोन वर्षामधील पक्ष फोडाफोडीच्या राजकारणामध्ये कोण कोणत्या पक्षात आहे . आणि कोणाची उमेदवारी नक्की झाली की कोणाची छाटली हे सांगणे अवघड झाले आहे. या राजकीय अफरातफरीमुळे सध्या भाजपमध्ये असलेले कोल्हे कुटुंबाला भाजपकडून उमेदवारी मिळण्याची आशा धूसर झाली आहे. असे असताना निवडणुकीसाठी दुसरा पर्याय काय ? याबाबत कोल्हेकडून कोणतेही स्पष्टता अद्याप तरी करण्यात आली नसल्याने आज कोपरगाव मध्ये कोल्हे उमेदवारीच करणार नसल्याच्या चर्चांना उधान आले असले तरी सर्व सामान्य नागरिकांकडून आजही काळे विरुद्ध कोल्हे असाच सामना रंगणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here