गाठोड्यात मृतदेह निघाला…. पण तो वासराचा, मात्र पोलिसांची उडाली धावपळ
देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे
राहुरी तालुक्यातील मुसळवाडी शिवारातील एका विहिरीत मृतदेह आढल्याची माहिती राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळताच पोलीस प्रशासनासह शासकीय रुग्णवाहिका घटना स्थळी दाखल झाली. पोलीसांनी विहिरीत डोकावले असता बारदाण्यात बांधलेल्या अवस्थेत मृतदेह असल्याचे दिसले.त्यानुसार सदर मृतदेहवर काढताच मृत अवस्थेतील वासरू असल्याचे दिसून आले. चर्चा मृतदेहाची अन निघाले वासरू यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली असल्याचे दिसून आले. राहुरी तालुक्यात सध्या अज्ञात मृतदेह आढळण्याचे प्रमाण वाढले असून यामुळे पोलिसांचीही डोकेदुखी वाढत आहे. अद्याप कुठल्याही अज्ञात मृतदेहाचा तपास पोलिसांना लागला नसताना पुन्हा एक अज्ञात मृतदेह विहिरीत आढळून आल्याने पोलिसांची चांगलीच डोकेदुखी होणार अशी चर्चा होत असताना खोदा पहाड निकला चुहा.. अशी म्हणण्याची वेळ आली होती.
राहुरी तालुक्यातील बेवारस मृतदेह आढळून आल्याच्या घटना सातत्याने घडत आहे. अजूनही सदर घटनेचा तपास प्रलंबित असताना राहुरी.तालुक्यातील मुसळवाडी- सेंटर रोडवरील महाडुक डॉ. कुलकर्णी यांच्या शेती विहिरीजवळील लगतच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या अज्ञात इसमांनी चरामध्ये दोन-तीन दिवसांपूर्वी शेडनेट व जनावरांचा चारा साठवून ठेवण्याच्या कुटीच्या विनर मध्ये दोन-तीन ठिकाणी दाव्याने बांधलेल्या माणसासारखा असलेल्या अवस्थेत मृतदेह टाकून दिला होता.त्याचा सडून वास सुटल्याने येणाऱ्या जाणाऱ्या ग्रामस्थांनी बघितले. त्यानंतर ग्रामस्थांनी घटनेची माहिती सरपंच नितीन धुमाळ यांना दिली. त्यानंतर धुमाळ यांनी राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना सदर घटनेची माहिती दिली.त्यानंतर राहरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे तातडीने घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पंचनामेसाठी सदर मृतदेह खोलला असता त्यात मेलेले गाईचे वासरू आढळून आले. सदर मृतदेह अज्ञात लोकांनी एखाद्या माणसाचे असल्यासारखे बांधलेले होते. परंतु तो जनावराचा निघाल्याने शासकीय यंत्रणा व ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला. परंतु या घटनेमुळे शासकीय यंत्रणेला व ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागला व त्यांची मोठी धावपळ उडाली होती. यावेळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.दरम्यान अज्ञातांनी केलेल्या या कृत्यामुळे उपस्थित ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली व सदर इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर पोलिसांनी कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
■ अन पोलीस प्रशासनाने सोडला सुटकेचा निश्वास
याप्रकारे एखाद्या माणसाचा मृतदेह प्रमाणे जनावराचा मृतदेह व्यवस्थित बांधुन विहिरीत फेकून देणे म्हणजे ही घटना कुठल्यातरी घटनेचे संकेत तर देत नाही ना? असाही प्रश्न नागरिकांमधून चर्चीला जात होता. माणसा प्रमाणे बांधलेला मृतदेह जनावराचा निघाल्याने पोलिसांनी ही सुटकेचा निश्वास सोडला.