गटशिक्षणाधिकार्यालय शाळेच्या दारी ; गुणवंत विद्यार्थी, शिक्षक पालक यांचा सत्कार

0

जामखेड तालुका प्रतिनिधी :- जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लटके वस्ती येथील शिष्यवृत्ती परीक्षेत एकूण सात विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आल्यामुळे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी पुढाकार घेऊन ज्याप्रमाणे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम राबवल्या जात आहे.

     त्याचीच प्रेरणा घेऊन गटशिक्षणाधिकारी कार्यालय शाळेच्या दारी या उपक्रमांअंतर्गत शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी, शिक्षक, पालक यांचा सत्कार करण्यासाठी कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी सर्व शाळेवर जाऊन गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे, शिक्षण विस्तार अधिकारी सुनील जाधव, गणपत चव्हाण, केंद्रप्रमुख  एम.निकम, संतोष राऊत,  सुरेश मोहिते, मल्हारी पाखरे, बाबासाहेब कुमटकर, रामदास गंभीरे,  संतोष वांढरे,नारायण राऊत, तसेच गटसाधन केंद्रातील कर्मचारी सुनील भामुद्रे,तुषार तागड, जावेद शेख, शेख मुद्देस्सीर, रमेश गीते, शाहू फाळके, संतोष कदम, जहांगीर  मुलांणी, श नागरगोजे ,  झिंजूर्के मॅडम व कार्यालयातील लिपिक संवर्ग या सर्वांनी शाळेत जाऊन सत्कार केला.

    यावेळी गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी गुणवंत विद्यार्थी शंभूराज कोल्हे, साईस बहिर, राजवीर भापकर, गौरव लवांडे,लक्ष्मी लटके,श्रेया गव्हाणे, तनया निकम व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या आदर्श शिक्षिका अनिता पवार आणि त्यांचे पालक त्यांचा सत्कार करण्यात आला.त्यावेळी विद्यार्थी पालक ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

चौकट :- अशा प्रकारे शाळेवर गटशिक्षणअधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी शाळेवर जाऊन सत्कार करणारी पहिलीच वेळ असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षक पालक यांच्यात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण तयार झालेले दिसून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here