गाडीचा धक्का लागल्याचा खोटा आरोप करीत रस्ता लूट

0

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी 

        राहुरी तालूक्यातील शिंगणापूर फाटा परिसरात नगर मनमाड राज्य महामार्गावर दिनांक ४ जानेवारी रोजी पहाटेच्या दरम्यान अज्ञात चार भामट्यांनी एक पिकअप गाडी आडवून चालकाचा मोबाईल व रोख रक्कम असा एकूण २३ हजार रूपयांचा मुद्देमाल लूटमार करून नेल्याची घटना घडलीय. 

        पंकज भाऊसाहेब भोसले हे राहुरी तालूक्यातील चिंचोली फाटा येथे राहत आहेत. ते हर्षल सुनिल राऊत, राहणार पिपळगांव फुणगी, ता. राहुरी. यांच्या मालकीच्या पिकअप गाडीवर चालक म्हणून काम करतात. राऊत यांची राहुरी एम आय डी सी येथे हार्विक इंटरप्रायझेस केमिकल ची कंपनी असून तिचा तयार होणारा माल हा पोहोच करण्याचे काम पंकज भोसले हे करतात.  ते सिध्देश्वर साखर कारखान्यासाठी माल पोहोच करण्यासाठी दिनांक ४ जानेवारी रोजी पहाटे तीन वाजेच्या दरम्यान पिकअप गाडी घेऊन चिंचोली फाटा येथून राहुरीकडे निगाले. तेव्हा पंकज भोसले हे राहुरी खुर्द परिसरातील शनिशिंगणापुर फाटाच्या पुढे नगर मनमाड रस्त्याने जात असताना त्यांच्या गाडीला अचानक एक पांढरे रंगाची स्विफ्ट कार येवुन ती आडवी लावली. त्यावेळी त्या कार मधुन एक इसम खाली उतरुन पंकज भोसले यांच्या जवळ येवुन मला म्हणाला की, तुला तुझी गाडी चालविता येत नाही का ? तुझ्या गाडी मुळे माझ्या गाडीला धक्का लागल्याने गाडीचे नुकसान झाले. असे म्हणत असताना सदर स्विफ्ट कारमधून तिन अनोळखी इसम उतरले. त्या सर्व चार जणांनी पंकज भोसले यांना गाडीच्या खाली ओढुन रोडच्या कडेला असलेल्या गचपणात नेले. त्यानंतर त्यांनी भोसले यांना चापटी व लाथा बुक्याने मारहाण करुन त्यांच्या खिशातील पाकीटात असलेली रोख रक्कम व मोबाईल असा एकूण २३ हजारांचा मुद्देमाल काढून घेतला. तेव्हा पंकज भोसले यांनी आरडा ओरडा केल्याने ते चार अज्ञात इसम अहमदनगरच्या दिशेने पळुन गेले. घटनेनंतर पंकज भोसले यांनी राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगीतला.

त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चार आरोपीं विरोधात गुन्हा रजि. नं. १८/२०२३ भादंवि कलम ३९४ प्रमाणे रस्तालूटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक घनश्याम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here