गाडीच्या बॅटऱ्या चोरणारा अरोपी एका तासात जेरबंद 

0

जामखेड पोलीसांची दमदार कामगिरी…. 

जामखेड तालुका प्रतिनिधी – जामखेड शहरातील भारत गॅस एजन्सी आरोळे दवाखान्याच्या पाठीमागे गॅस एजन्सी मधील गाडीच्या दोन बॅटऱ्या आज्ञात चोराने चोरी गेल्याची फिर्याद सुरज पोकळे यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिली  

त्यानुसार भारत गॅस एजन्सी गोडाऊन येथे महेंद्र जितो कंपनीची गाडी क्रमांक एम एच १६ सीडी २८१२ या गाडीचे बॅटरी चोरी गेली आहे. तसेच दुसरे गाडी महेंद्र जितो गाडी क्रमांक एम एच १६ सीडी २८०५  हिची पण अँमेरॉन कंपनीची बॅटरी चोरी गेली आहे अशी फिर्याद जामखेड पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली  त्यानुसार जामखेड चे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या आदेशाने पोलीस हवालदार प्रवीण इंगळे यांना चौकशीसाठी पाठविले असता त्या ठिकाणी चौकशी केली असता त्यानी सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता त्या ठिकाणी त्यांना अज्ञात इसमाला संशयित म्हणून ताब्यात घेतले.

तसेच अज्ञात व्यक्ती हा लक्ष्मी चौक येथे त्यांना आढळून आला असता त्याला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला घेऊन आले आरोपीला पोलीस खाकी दाखविताच बॅटऱ्या चोरी केल्याची कबुली अरोपीनी दिली. आरोपीला अटक केल्यानंतर कर्जत न्यायालयसमोर हजर केले असता आरोपीला दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.तसेच अरोपी कडुन दोन बॅटऱ्या रिकव्हरी पण करण्यात आल्या आहे. पुढील तपास पोलीस नाईक सरोदे हे करीत आहे तालुक्यातुन जामखेड पोलीसांचे कौतुक होत आहे 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here