जिल्हा परिषदेच्या शाळा सर्वगुणसंपन्न ;गुडघे परिवाराकडून शाळेत सीसीटीव्ही सठी 31 हजार रुपये
पोहेगांव प्रतिनिधी : पापी माणसाचा शेवट हा पिक्चर मधल्या खलनायका प्रमाणे असतो. जग सध्या स्वार्थी झाले असून खरे बोलणाराचा ठिकाव येथे लागत नाही. आयुष्यात नीती सोडू नका कधीच अधोगती होणार नाही. मुलांना शाळेत संस्कार होणे गरजेचे असून शाळेतील मोबाईल बंद व्हायला पाहिजे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अनेक विद्यार्थी घडले. याच शाळा सर्वगुणसंपन्न असून या शाळा अजून चांगल्या कशा होतील यासाठी गाव पुढार्यांनी काम केले पाहिजे असे प्रतिपादक समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केले.ते काल कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे बोलत होते.
सोनेवाडी चांदेकरसारे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व सोनेवाडी सोसायटीचे माजी अध्यक्ष दौलतराव दशरथ गुडघे यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनेवाडी येथे सीसीटीव्ही बसवण्यासाठी 31 हजार रुपयांची देणगी गुडघे परिवाराच्यावतीने देण्यात आली. डीएम कार्डिओलॉजी डॉ. राहुल गुडघे यांनी संपूर्ण गावाच्या पंचक्रोशीतील रुग्णांची मोफत हृदय रोग तपासणी यानिमित्ताने करणार असल्याची जाहीर केले.
यावेळी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे, शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे, काळे कारखान्याचे उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण, किरण महाराज, माजी संचालक अरूण येवले, उपाध्यक्ष मनीष गाढे, ज्ञानदेव औताडे, विश्वनाथ जावळे ,शिवाजी जावळे, तुकाराम गुडघे,बाबासाहेब फटांगरे,अमोल औताडे, प्रशांत रोहमारे, विठ्ठलराव गुडघे, लक्ष्मण दिघे, दत्तात्रय गुडघे, निरंजन गुडघे ,बाळासाहेब गुडघे, डॉक्टर शिवाजी गुडघे, लक्ष्मीकांत गुडघे ,संतोष गुडघे ,सचिन गुडघे, सरपंच शकुंतला गुडघे, उपसरपंच संजय गुडघे, पोलीस पाटील दगू गुडघे, धर्मा जावळे, राजेंद्र गुडघे अदी उपस्थित होते.
युवा नेते विवेक कोल्हे व दत्तात्रय गुडघे यांनी निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचा सत्कार केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ संदीप दिघे,सागर गुडघे, केतन गुडघे, ऋषिकेश गुडघे, हर्षल गुडघे यांनी विशेष परिश्रम घेतले.