गुढीपाडव्याच्या दिवशीच संगमनेरात गोहत्या ; पोलिसांच्या कारवाईत ७०० किलो गोमांस जप्त 

0

संगमनेर : शहरातील मदिना नगर परिसरात असणाऱ्या एका वाड्यामधून गोवंश जनावरांचे सुमारे पावणे दोन लाख रुपयांचे सातशे किलो गोमांस शहर पोलिसांनी जप्त केले. पोलिसांचा हा छापा पडत असताना आरोपी नेहमीप्रमाणे पळून जाण्यात यशस्वी ठरला.

          सणासुदीच्या दिवशी सुद्धा संगमनेरात गोहत्या झाल्याने गोप्रेमी मधून प्रचंड मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे. संगमनेरात गोहत्या बंदीच्या कायद्याला येथील कसायानी आपल्या खिशात कोंबून  ठेवले आहे. अनेकदा संगमनेर आणि शहरा नजीकच्या परिसरात पोलिसांनी छापे टाकत लाखो रुपयाचे गोमांस आणि गोमांस वाहतूक करणारी वाहने ताब्यात घेतली, मात्र येथील कत्तलखाने बंद होण्याऐवजी सुरूच असल्याचे चित्र या घटनेवरून समोर आले आहे. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना शहरातील मदिना नगर मध्ये दारुल मदिना स्कूलच्या पाठीमागे एका वाड्यात  जिवंत गोवंश जनावरांची कत्तल होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी शहर पोलीस ठाण्याच्या पथकाला तेथे छापा टाकण्याचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव,पोलीस कर्मचारी कानिफनाथ जाधव, दाभाडे,गवळी,उगले यांच्या पथकाने मराठी नववर्ष दिनी छापा टाकला, यावेळी तेथे मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरांची कत्तल केल्याचे आढळून आले.पोलिसांचा छापा पडल्याची चाहूल लागल्याने कत्तलखाना चालक नेहमीप्रमाणे पसार होण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी यांना बोलावून घेतले आणि सदर गोमांसाची तपासणी केली असता सुमारे ७०० किलो वजनाचे १ लाख ७५ हजार रुपयांचे गोमांस तेथे आढळून आले. पोलीस तपासात पळून जाणाऱ्या व्यक्तीचे नाव फरीद जावेद कुरेशी (रा. जमजम कॉलनी संगमनेर)असे असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल कानिफनाथ जाधव यांनी फिर्याद दिली असून शहर पोलिसांनी फरीद जावेद कुरेशी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here