नगर – सावेडी उपनगरातील शिलाविहार येथील श्रीब्रह्मचैत्यन्य गोंदवलेकर महाराज मंदिरात गुरुपौर्णिमा सप्ताहाची सांगता काल्याचे किर्तनाने झाली. गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त भागवत कथा आयोजित करण्यात आली होती. बीडचे महाराज नंदकुमार रामदासी यांनी निरूपण केले. भविकानी कथा ऐकण्यासाठी गर्दी केली होती.
सोमवारी सकाळी मंदिरापासून ग्रंथ, पादुका, पालखी मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी दर्शनाला गर्दी होत होती. दुपारी हभप कृष्णा महाराज रामदासी यांनी भागवत कथा महात्म्य, गुरूंचे जीवनातली महत्व, गोपालकाला केल्याने जिवन सार्थक कसे होते याचे विमोचन कीर्तनातून केले.
यावेळी सुंदरदास रिंगणे, रेखाताई रिंगणे, नगरसेवक सुनील त्र्यंबके, निखिल वारे, योगेश पिंपळे, माऊली गायकवाड, बिभीषण अनभुले व सेवा भावी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. काल्याचे कीर्तन झाल्यावर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला मंडळाचे सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले त्याबद्दल प्रसाद देवा यांनी आभार मानले.