नगर – सावेडी उपनगरात शिलाविहारला गुरुपौर्णिमेनिमित्त श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहास रविवार (दि.14) रोजी प्रारंभ होत आहे.
या सप्ताहामध्ये दररोज ‘श्रीं’ च्या चरित्र ग्रंथाचे पारायण होणार आहे. सकाळी 9 ते 11 व्यासपिठचालक मनिषा भोंग चरित्र ग्रंथाचे वाचन सात दिवस करतील. दुपारी 12 वा. नैवद्य व आरती झाल्यावर 12.30 ते 1.30 या वेळेत महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडणार आहे. तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन सुंदरदास रिंगणे यांनी केले आहे.
या सप्ताहामध्ये 24 तास अखंड नामजप होईल. दर एक तासाने भाविकांनी माळ जपासाठी बसावे. ज्या भाविकांना पारायण करायचे असेल त्यांनी श्री विजय मते (मो.9225322389) यांच्याशी संपर्क साधून ग्रंथ उपलब्ध करुन घ्यावा, असे सौ.रेखाताई रिंगणे यांनी सांगितले.
गुरुपौर्णिमेचा मोठा उत्सव दरवर्षी येथे होत असतो. परंतु सध्या मंदिराचे बांधकाम सुरु आहे. जागेअभावी यावर्षी भागवत ठेवता आले नाही. तरी रोजचा हरिनाम जप, भजने, हरिपाठ कार्यक्रम होतील, अशी माहिती प्रसाद देवा यांनी दिली.
सप्ताहाची सांगता रविवार दि.21 जुलै रोजी हभप झाडे महाराज यांच्या काल्याचे किर्तनाने होईल. तरी सर्व भाविकांनी सप्ताहात नामस्मरण करुन पारायण सोहळ्याचे श्रवणास, महाप्रसादासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन ब्रह्मचैतन्य सेवाभावी मंडळाने केले आहे.