पोहेगांव (प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी चांदेकसारे परिसरात वरदान ठरलेल्या गोदावरी कालव्याच्या चाऱ्यांना पाणी सोडा शेतकऱ्यांची पिके वाचवा अशी मागणी शेतकरी विश्वनाथ जावळे यांनी केली आहे.
या परिसरात शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये ऊस सोयाबीन मका कपाशी भाजीपाला आधी पिके घेतलेली आहे. पावसाने नेहमीच्या परिसराला हुलकावणी दिली असल्याने या परिसरात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. पाटबंधारे विभागाने केलेल्या आव्हानाला शेतकऱ्यांनी प्रतिसाद देऊन सात नंबर फार्म भरलेले आहेत. मात्र एवढे करून देखील पाटबंधारे विभागाचे अधिकाऱ्यांकडून या चाऱ्या का सुटल्या जात नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सोयाबीन मका हे पिके शेवटच्या पाण्यावर आले आहेत. आज जर या पिकांना पाणी मिळाले नाही तर हे पिके उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. 27 चारी, 26 चारी व हरिसन ब्रॅच चारी तातडीने सोडा अशी मागणी त्यांनी केली आहे. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन केला असता त्यांनी सध्या खड्डे भरण्याचे काम सुरू असून शेतकऱ्यांची मागणी नसल्याचे विचित्र उत्तर दिले असल्याचेही जावळे यांनी सांगितले. जर या परिसराला येत्या दोन-तीन दिवसात पाणी मिळाले नाही तर येथील शेती पिके उध्वस्त होतील. व यास पाटबंधारे विभागाचे अधिकारी जबाबदार राहतील असेही जावळे यांनी सांगितले.