गोदावरी कालव्यांना रब्बीचे एक तर उन्हाळसाठी तीन आर्वतने देण्याचा निर्णय- विवेक कोल्हे

0
फोटो ओळी - कोपरगांव- नागपुर हिवाळी अधिवेशनात गुरुवारी जिल्हयाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गोदावरी कालवा सल्लागार समितीची बैठक झाली त्यात जिल्हा बँकेचे संचालक विवेक भैय्या कोल्हे यांनी सहभाग घेवुन शेतक-यांच्या पाटपाण्यांच्या समस्या सांगितल्या.

कोपरगांव :- दि. २२ डिसेंबर

             गोदावरी कालव्यांना रब्बीचे एक तर उन्हाळयात तीन पाटपाण्यांचे आर्वतन देण्यांचा महत्वाचा निर्णय महसुल तथा अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला अशी माहिती जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी दिली.

           नागपुर विधानभवन येथे हिवाळी अधिवेशन सुरू असुन जिल्हयाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरूवारी कालवे सल्लागार समितीची बैठक घेतली. याप्रसंगी आमदार आशुतोष काळे, आमदार लहु कानडे, आमदार माणिकराव कोकाटे, जलसंपदा खात्यचे सचिव, नाशिक पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे, उपअभियंता गायकवाड, उपअभियंता मिसाळ यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी प्रतिनिधी, शेतकरी आदि उपस्थित होते. 

         विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, गोदावरी कालव्यांचे आयुर्मान शंभर वर्षांपेक्षा जास्त झालेले आहे. त्याच्या नुतणीकरणाचे काम शिंदे फडणवीस शासनाने हाती घेवुन त्यासाठी मोठया प्रमाणात निधी देवुन निवीदास्तरावरील कामे चांगल्या पध्दतीने करण्याबाबतच्या सुचना दिल्या आहे, जी कामे निवीदास्तरावर आहेत त्याच्याही निवीदा अंतिम करून त्याचीही कामे तातडीने हाती घेतली जावी. गोदावरी कालवा पाण्याच्या आवर्तन काळात फुटणार नाही याबाबत अधिकाऱ्यांनी वेळीच नियोजन करावे, चालु वर्षी पर्जन्यमान चांगले झालेले आहे. 

           बारमाही गोदावरी कालवे लाभधारक शेतक-यांना पुर्ण क्षमतेने कालवा आर्वतन काळात पाणी मिळावे यासाठी नाशिक पाटबंधारे विभागाअंतर्गत कर्मचा-याचा तुटवडा आहे तेंव्हा हे कर्मचारी तातडीने भरून शेतक-यांना विना तक्रार रब्बीसाठी एक तर उन्हाळसाठी तीन आर्वतन द्यावी म्हणजे त्यांच्या शेत पिकांचे नुकसान होणार नाही.  गोदावरी कालव्यावर बहुताष गावांच्या पिण्याच्या पाण्याच्याही योजना असून त्यांनाही व्यवस्थीतरित्या पाण्याचा पुरवठा व्हावा असे ते शेवटी म्हणाले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here