गोदावरी दुध संघ झाला ५० वर्षांचा !

0

अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये साजरा होणार सुवर्ण महोत्सव सोहळा….

कोपरगाव प्रतिनिधी : गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघास येत्या २० जानेवारी २०२५ रोजी ५० वर्षे पूर्ण होत आहे. या सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त संघाने शेतकरी दूध उत्पादकांच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी नव्या आधुनिक विविध प्रकल्पांचा प्रारंभ आणि वीज निर्मिती प्रकल्प, नवीन खवा बनवणाऱ्या प्रकल्पांचा प्रारंभ तसेच कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी कर्मचारी वसाहतीच्या बांधकामाचा पायाभरणी शुभारंभ  राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे व जलसंपदा तथा अहिल्यानगरचे पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते व कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाचे अध्यक्ष मिनेश शहा, आमदार प्रा. रमेश बोरणारे ,आमदार आशुतोष  काळे, आमदार अमोल खताळ ,आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार काशिनाथ दाते ,यांच्या उपस्थितीत २० जानेवारी २०२५ सोमवारी रोजी सकाळी १० .०० वाजता संघाच्या कार्यस्थळावर होणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी दिली.

परजणे याबाबत अधिक माहिती देताना म्हणाले की दुग्ध व्यवसायातील वाढत्या स्पर्धेत टिकण्यासाठी व दूध उत्पादक तसेच शेतकरी विक्रेते ग्राहक यांच्या हितासाठी गोदावरी दूध संघाने अनेक आधुनिक तंत्रज्ञान विकसित करून सहकारी दूध संघात नवीन क्रांति केली आहे दूध संघाच्या खर्चात बचत करण्यासाठी वीज निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले आहे. संघाने स्वमालकीचा दीड मेगा वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभा केला आहे असून या प्रकल्पातून तयार होणाऱ्या विजेतून तब्बल पन्नास टक्के वीज बिल वाचवण्यात आले आहे . सूक्ष्म निर्जंतुकीकरण करून ग्राहकांना अधिक दर्जेदार दूध देण्यासाठी नव्या मिल्क क्लेरिफायर मशिन बसवण्यात आली आहे जुन्या पारंपरिक  पद्धतीने  खवा बनवण्याच्या पद्धतीला पूर्णविराम देत खव्याच्या दर्जामध्ये अधिक सकसपणा यावा तसेच कमी वेळेत योग्य पद्धतीने एकसारखा खवा तयार व्हावा म्हणून संघाने कन्ट्यून्युअस खवा मेकिंगची आधुनिक मशीन बसवली आहे अवघ्या तासात खवा बनवला जाणार आहे तसेच नव्या पद्धतीचे जलशुद्धीकरण व पाणी साठवण्याचे टॅंक बसवून संघाची संपूर्ण दूध प्रकल्पाची प्रक्रिया आधुनिक केली आहे सहकारी क्षेत्रातील गोदावरी दूध संघ हा एकमेव दूध संघ आहे की तो आधुनिकीकरणात अव्वल आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here