कोपरगाव : दिनांक १६ जुलै २०२४ रोजी गोधेगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या व्हाईस चेअरमनपदी कोल्हे गटाच्या सौ.सरस्वती उत्तमराव रांधवणे यांची निवड चेअरमन बापूसाहेब हरिभाऊ पठाडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली.
व्हा.चेअरमन रंजन सारंगधर साळुंके यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर कोल्हे गटाच्या सौ. सरस्वती उत्तमराव रांधवणे यांची आज बिनविरोध निवड झाल्याने त्यांचे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे,युवानेते विवेक कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे.
सहकारी सोसायटी या शासन आणि शेतकरी यांच्यातील आर्थक्रंतीच्या दुवा म्हणून काम करतात.शेती क्षेत्राला उभारी देण्यासाठी सोसायट्या महत्वाचे केंद्र आहेत.ग्रामीण भागात नावीन्यपूर्ण आणि काळानुसार बदलते धोरण शेतीला अडचणीचे ठरू नये यासाठी सुलभ आणि सहज सहकार्य या दृष्टीने सहकारी सोसायटी मोलाची भूमिका वठवत असल्याने शेतकरी वर्गासाठी काम करण्याची मिळणारी संधी महत्वाची ठरते.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणूनसंदीप नेरे ( सहकार खाते) यांनी काम पाहिले त्यांना अशोकराव घेर सचिव तसेच दत्तात्रेय कारभार सहाय्यक सचिव यांनी सहाय्य केले. नवीन निवडीसाठी चेअरमन बापूसाहेब हरिभाऊ पठाडे,कारभारी रामचंद्र गायकवाड,गणपत जगन भोकरे,बाळू किसन सोळसे,भाऊलाल रामराव कन्हेर,अरुणाबाई भाऊसाहेब भोकरे,रंजन सारंगधर साळुंखे,पंढरीनाथ बाबुराव पठाडे,रामचंद्र दादा भाटे,उत्तम कारभारी माने,भानुदास नामदेव कोळसे,सरस्वती उत्तमराव रांधवणे आदी संचालक उपस्थित होते तसेच यावेळी माधवराव रांधवणे,जनार्दन शिंदे,बबनराव साळुंखे,भाऊसाहेब शिरसाट,रवींद्र रांधवणे,सुभाष कानडे,भाऊसाहेब भोकरे,कचरू भाटे,राकेश रांधवणे,शशिकांत रांधवणे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते हजर होते.